Latest

Elon musk: टेस्लाचे प्रमुख एलन मस्क पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: टेस्ला आणि ट्विटर कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी फ्रेंच उद्योगपती लक्झरी टायकून बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये फ्रेंच उद्योगपती अरनॉल्ट यांनी एलन मस्क यांंना मागे टाकले होते. आता पुन्हा टेस्ला, ट्विटरचे प्रमुख एलन मस्क (Elon musk) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

पॅरिसच्या बुधवारी (दि.३१) मार्केटमध्ये उद्योगपती अरनॉल्ट यांच्या LVMH कंपनीचे शेअर्स २.६ टक्क्यांनी कोसळले. असे ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात स्पष्ट (Elon musk) केले आहे. एप्रिलपासून, LVMH चे बाजारमूल्य सुमारे १० टक्क्यांनी घसरले आहे. दरम्यान एका क्षणाच्या बाजारातील अस्थिरतेने LVMH चे मालक ७४ वर्षीय फ्रेंच उद्योगपती लक्झरी टायकून बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत तब्बल ११ अब्ज डॉलरची घसरण झाली आहे.

यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये मस्क (Elon musk) यांच्या टेस्ला कंपनीच्या मूल्यात मोठी घसरण झाली होती, तेव्हा लुईस व्हिटॉन्स मोएट हेनेसीचे सीईओ अरनॉल्ट यांनी एलन मस्क यांना पाठेमागे टाकत, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. यानंतर पुन्हा टेस्लाने मुसंडी घेत फ्रेंच उद्योगपती लक्झरी टायकून बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकत एलन मस्क पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT