Latest

Electric Car : चिनी ऑटोमेकर ‘BYD’ चा भारताला ‘1 अब्ज डॉलर’ गुंतवणुकीचा प्रस्ताव; इलेक्ट्रिक कार आणि बॅटरीच्या उत्पादनाची योजना

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Electric Car : चिनी ऑटोमेकर कंपनी BYD ने इलेक्ट्रिक कार आणि बॅटरीच्या उत्पादनासाठी भारतात 1 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव भारताला दिला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार कंपनीने हैदराबादस्थित निर्माता मेघा इंजिनिअरिंग (Megha Engineering and Infrastructures) आणि इन्फास्ट्रक्टर्सशी भागीदारी केली आहे आणि हा प्रस्ताव भारतीय नियामकांना सादर केला आहे.

Electric Car : भारतात दरवर्षी 1 लाख इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याचे उद्दीष्ट

स्टार्ट अप न्यूजच्या माहितीनुसार, कंपनी भारतात हॅचबॅक ते लक्झरी मॉडेल्सपर्यंत पसरलेल्या वाहनांची व्यापक श्रेणी लाँच करू इच्छिते. येत्या काही वर्षांत भारतात दरवर्षी एक लाख इलेक्ट्रिक वाहने (EVS) तयार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. तथापि, सुरुवातीला, BYD चा स्वतःच्या पुरवठा साखळीचा वापर करून वाहनांचे भाग आयात करण्याचा आणि देशभरात एकत्रित करण्याचा मानस आहे.

ईव्ही उत्पादनासह चार्जिंग, संशोधन व प्रशिक्षणाचीही योजना

या प्रस्तावात फक्त इलेक्ट्रॉनिक्स वाहने उत्पादनाची कंपनीची योजना नाही. तर मेघा इंजिनिअरिंग आणि BYD ला इव्हीसाठी लागणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा, चार्जिंग स्टेशन्स स्थापन करणे, संशोधन आणि विकास केंद्रे उभारणे, प्रशिक्षण सुविधा उभारण्याचीही कंपन्यांची महत्वाकांक्षा आहे.

Electric Car :BYD च्या प्रस्तावाला भारत सरकार मान्यता देणार?

भारत हा सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून उदयास येत आहे. विशेष करून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी. तसेच ऑटोमोटिव्ह बाजारपेठसाठी लक्षणीय वाढीची क्षमता आहे. त्यामुळे चीनी गुंतवणूकदारांना देखील चीनपासून दूर त्यांच्या उत्पादनात विविधता आणण्याचा मानस आहे. मात्र, BYD च्या प्रस्तावाला भारतीय नियामकांकडून मान्यता मिळणार का हा मोठा प्रश्न आहे. कारण भारत-चीन संबंध गेल्या 2-3 वर्षात मोठ्या प्रमाणात ताणले गेले आहेत. 2020 मधील गलवान खोऱ्यातील चीनी घुसखोरी आणि सीमा संघर्षानंतर भारताने चिनी गुंतवणुकीसाठी नियम अतिशय कडक केले आहेत. त्यामुळे भारतीय नियामक या प्रस्तावावर काय निर्णय घेतील यावर पुढची गणिते अवलंबून असणार आहेत.

Electric Car : देशातील ईव्ही विक्रीचा वाटा सध्या केवळ 1 टक्के

भारत हा आजमितीला ऑटोमेटिव्ह हब आणि मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आला असला तरी सध्या इलेक्ट्रिक कार विक्रीचा वाटा केवळ 1 टक्के आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वाढण्याची अपेक्षा आहे. भारताचा आकार आणि ऑटोमोबाईल्सची वाढती मागणी याच्या जोडीने, BYD सारख्या कंपन्यांसाठी त्यांच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी आणि देशातील विकसित इलेक्ट्रिक मोबिलिटी लँडस्केपमध्ये टॅप करण्यासाठी एक आकर्षक बाजारपेठ बनते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT