Latest

तीन राज्यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम आज होणार जाहीर?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : ईशान्येकडील नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्‍याची शक्‍यता आहे. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आज दुपारी भारतीय निवडणूक आयोगाकडून (ECI) पत्रकार परिषदेद्वारे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये या तिन्ही राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने नागालँड, मेघालय आणि त्रिपुराला भेट दिली. या काळात निवडणूक आयोगाने केंद्रीय सुरक्षा दलाशीही संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे. या तीन राज्यांची स्थिती पाहिल्यानंतर आता निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे.

नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा विधानसभेचा कार्यकाल क्रमश: १२ मार्च, २२ मार्च आणि १५ मार्चला पूर्ण होत आहे. त्यामुळे या राज्यांतील निवडणुकांसाठी स्थानिकांपासून ते राष्ट्रीय पक्षांनीही कंबर कसली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT