Latest

राहुल गांधींच्‍या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकार्‍यांकडून तपासणी

नंदू लटके

पुढार ऑनलाईन डेस्‍क : निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतील निलगिरीमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

या प्रकरणी स्‍थानिक पोलिसांनी सांगितले की, राहुल गांधी यांचे हेलिकॉप्‍टर निलगिरी येथे उतरले. यावेळी निवडणूक आयोगाच्‍या उड्डाण पथकाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. राहुल गांधी हे केरळमधील त्यांच्या संसदीय मतदारसंघ वायनाड येथे जात होते. राहुल गांधी हे  आज निवडणूक प्रचारात भाग घेण्‍यापूर्वी हा प्रकार घडला.

राहुल गांधी यांच्‍याव्यतिरिक्त, निवडणूक अधिकाऱ्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र व मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी केली, तामिळनाडू आणि केरळ राज्‍यांमध्‍ये प्रचाराची रणधुमाळी चेगावली आहे. राज्यांमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. येथे त्यांचा सामना सीपीआय नेत्या ॲनी राजा आणि भाजपचे उमेदवार सुरेंद्रन यांच्याशी होणार आहे.

राहुल गांधींचा वायनाडमध्ये रोड शो

राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या सीमावर्ती भागातील निलगिरी जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी सुलतान बथेरीमध्ये त्यांच्या रोड शोमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते.

या वेळी राहुल गांधी म्‍हणाले की, "आमचा लढा प्रामुख्याने राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या विचारसरणीशी आहे. भाजप आणि पंतप्रधान म्हणतात की त्यांना एक राष्ट्र, एक निवडणूक, एक नेता, एक भाषा हवी आहे. भाषा ही लादलेली गोष्ट नाही. भाषा ही अशी गोष्ट आहे जी त्यातून येते. लोकांमध्ये तुमची भाषा हिंदीपेक्षा निकृष्ट आहे, असे म्हणणे म्हणजे देशातील सर्व तरुणांचा अपमान आहे, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT