Latest

एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषदेत काय बोलणार?; काँग्रेस- राष्ट्रवादीची साथ सोडण्याची घालू शकतात अट

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : शिवसेनेशी बंडखोरी करत सुरतला गेलेले मंत्री एकनाथ शिंदे दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँगससोबत सुरू असलेले सरकार आम्हाला मान्य नसून त्यांची सात सोडण्याची अट शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार उद्धव ठाकरे यांना घालू शकतात.

शिवसेना कडवट हिंदुत्ववादी आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केल्यामुळे आमचे मतदार नाराज आहेत. या सरकारमध्ये आमची कामे होत नाहीत. शिवसेना आमदारांना काँग्रेस – राष्ट्रवादीकडून दुजाभावाची वागणूक दिली जाते. मुख्यमंत्रीपद असतानाही आम्हाला निधी मिळत नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा, अशी भूमिका शिंदे आणि त्यांचे समर्थक घेऊ शकतात.

प्रशासकीय कोंडीने शिंदेंची अस्वस्थता वाढली

गेले काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांना डावलल्याची आणि त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न शिवसेनेतून सुरू होते. त्यांच्या नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यामध्ये देखील मुख्यमंत्र्यांचा थेट हस्तक्षेप सुरू होता. नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी आणि एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना आपल्या मंजुरीशिवाय शिंदे यांच्या फाईली क्लिअर करू नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे या प्रशासकीय कोंडीने एकनाथ शिंदे जास्तच अस्वस्थ होते.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT