Latest

Tamil Nadu | फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

दीपक दि. भांदिगरे

कृष्णगिरी (तामिळनाडू); पुढारी ऑनलाईन : तामिळनाडूच्या (Tamil Nadu) कृष्णगिरी जिल्ह्यात आज शनिवारी सकाळी फटाक्यांच्या कारखान्याच्या गोदामात झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पझायापेट्टई भागात रवी नावाच्या एका फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला, अशी माहिती कृष्णगिरीचे पोलिस अधीक्षक सरोज कुमार ठाकोर यांनी दिली.

कारखान्यातील आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पसरली. या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले.

"या दुर्घटनेतील ८ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. काही जखमींना उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे," अशी माहिती ठाकोर यांनी दिली. जखमी आणि बचावलेल्या लोकांना उपचारासाठी कृष्णगिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याआधी मंगळवारी विरुधूनगर जिल्ह्यातील शिवकाशी सिटी येथे फटाके बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, कृष्णगिरी येथील घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT