Latest

Byju’s ‘ईडी’च्या रडारवर, ३ ठिकाणांची झडती, कागदपत्रे, डिजिटल डेटा जप्त, फेमा अंतर्गत कारवाई

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) शनिवारी बायजूच्या नावाने एडटेक प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या 'थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन यांच्याशी संबंधित तीन ठिकाणांची झडती घेतली. ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या तरतुदींतर्गत बंगळूरमध्ये ही कारवाई केली आहे. यादरम्यान विविध कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त केला. बायजू रवींद्रन हे Byju's चे सीईओ आहेत.

तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, या कंपनीला २०११ ते २०२३ दरम्यान २८ हजार कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक (FDI) मिळाली होती. याच कालावधीत Byju's ने परदेशी थेट गुंतवणुकीच्या नावाखाली विदेशात सुमारे ९,७५४ कोटी रुपये पाठवले.

ईडीच्या म्हणण्यानुसार, थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडने परदेशात पाठवलेल्या पैशासह जाहिरात आणि मार्केटिंगसाठी सुमारे ९४४ कोटी रुपये खर्च केले होते. दरम्यान कंपनीने आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून आर्थिक ताळेबंद तयार केलेला नाही आणि तसेच त्यांच्या अकाउंट्सचे लेखापरीक्षणही मिळालेले नाही. त्यामुळे कंपनीने दिलेल्या आकडेवारीची सत्यता पडताळून पाहिली जात असल्याचे ईडीने म्हटले आहे.

अनेक व्यक्तींकडून आलेल्या विविध तक्रारींच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आहे. ईडीने केलेल्या तपासादरम्यान, बायजू रवींद्रन यांना अनेक समन्स बजावण्यात आले होते. पण ते चौकशीसाठी कधीही हजर झाले नव्हते.

दरम्यान, बायजूच्या प्रवक्त्याने सांगितले की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी बंगळूरमधील त्यांच्या एका कार्यालयाला दिलेली भेट फेमा अंतर्गत नियमित चौकशीशी संबंधित होती. त्यांची बाजू पूर्णपणे पारदर्शक असून अधिकाऱ्यांनी मागितलेली सर्व माहिती त्यांना दिली आहे. (Byju's)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT