Latest

‘तृणमूल’ ठरला सर्वाधिक इलेक्‍टोरल बॉण्ड्स मिळवणारा दुसरा पक्ष!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सर्वोच्च न्यायालयाने सीलबंद कव्हरमध्ये दिलेला इलेक्ट्रोरल बाँड्सचा (निवडणुक रोखे) नवीन डेटा निवडणूक आयोगाने आज आपल्‍या वेबसाइटवर अपलोड केला आहे. यामध्ये राजकीय पक्षांना निधीसंदर्भातील डेटा असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या ताज्या डेटामध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष भाजप नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे इलेक्टोरल बॉण्ड्स मिळवणारे पक्ष असल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍याचे वृत्त 'इंडिया टीव्‍ही'ने दिले आहे.

विविध पक्षांनी इलेक्टोरल बॉण्ड्समधून किती रक्कम जमा केली आहे हे देखील डेटाने दाखवले आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी, AIADMK, नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि इतर सारख्या पक्षांना इलेक्टोरल बाँड्सद्वारे देणग्या मिळाल्या.

भाजप पहिल्‍या क्रमांकावर, पक्षाकडे 6,986.5 कोटी रुपयांचे इलेक्‍टोरल बॉण्ड्स

पक्षनिहाय निवडणुक रोखे : भाजप : 6,986.5 कोटी रु, तृणमूल काँग्रेस : 1,397 कोटी रु, काँग्रेस : 1,334.35 कोटी, बीआरएस 1,322 कोटी रु., बिजू जनता दल: 994.5 कोटी रु, वायएसआर काँग्रेस : 442.8 कोटी रु, तेलगू देसम पार्टी 181.35 कोटी रु, समाजवादी पार्टी 14.05 कोटी रु. आदी. अन्‍य पक्षांचेही निवडणूक रोख्‍यांची माहिती वेबसाईटवर अपलोड करण्‍यात आली आहे. हे तपशील 12 एप्रिल 2019 पूर्वीच्या कालावधीशी संबंधित असल्याचे मानले जाते. या तारखेनंतरचे निवडणूक रोखे तपशील गेल्या आठवड्यात मतदान पॅनेलने सार्वजनिक केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही आकडेवारी समोर आली आहे.

12 एप्रिल 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार राजकीय पक्षांनी निवडणूक रोख्यांवर डेटा सीलबंद कव्हरमध्ये दाखल केला होता.

इलेक्टोरल बाँड्सप्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले होते SBIला निर्देश

१२ मार्च रोजी सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीपर्यंत EC ला बाँड्सचे तपशील जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT