Latest

Jaysingpur Market : जयसिंगपुरात रताळे खाताय तर सावधान, चक्क रस्त्यावरील सांडपाण्यात धुतात रताळी

backup backup

Jaysingpur Market : रताळी पोष्टीक असतात त्यामुळे या कंदांना मोठी मागणी असते. मात्र, जयसिंगपूर परिसरातील रताळ खाताय तर नागरीकांनो सावधान व्हा. कारण येथील नेहरू चौकात रस्त्यावरील असलेल्या सांडपाण्यात व्यापारी रताळी धुवून ते विक्रीस ठेवत आहेत. सदर प्रकार नागरीकांनी पाहून संबंधीत व्यापार्‍यांना जाब विचारून पालिकेकडे तक्रार केली आहे. या प्रकारामुळे नागरकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

रविवारी शहराचा मुख्य आठवडी बाजार असतो. तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातून ग्राहक व नागरीक बाजारासाठी येतात.

या बाजारात रविवारी सकाळी ११ च्या सुमारास येथील ९ व्या गल्लीत असलेल्या दोन महिला व्यापारी आपल्याकडे असलेल्या रताळ्याचा माल रस्त्याकडेला असलेल्या सांडपाण्या धुवत होत्या.

Jaysingpur Market : नागरीकांचा संताप

नागरीकांनी हा प्रकार पाहून याचा चांगलाच जाब विचारला. त्यानंतर नागरीकांनी याबाबतची तक्रार पालिकेकडे केली आहे.

आठवड्या बाजारात नागरीक चांगला भाजीपाला व इतर साहित्य मिळावे यासाठी नागरीक येतात.

मात्र घडलेल्या या प्रकारामुळे जयसिंगपूरकरांना रताळी कसे खायचं असा प्रश्न पडला आहे.

यामुळे पालिकेने अशा व्यापार्‍यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शिवाय आठवडी बाजारात पालिकेकडून कर घेतला जातो.

त्या मानाने व्यापार्‍यांना सुरळीत व विविध उपाययोजना करून बाजार भरविला जात नाही. कोणीही या आणि कोठेही बसा. असा प्रकार नित्याचा आहे.

जयसिंगपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

सांडपाण्याने रताळी धुवून विक्री करण्याच्या प्रकाराने पालिकेने आतातरी व्यापार्‍यांना सक्त सुचना देण्याची गरज आहे.

अन्यथा जयसिंगपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न भिडसावण्याची शक्यता आहे.

दरम्यान रस्त्यावरील सांडपाण्यात धुवत असलेल्या रताळेंचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात फिरत असल्याने संतप्त प्रतिक्रीया येत आहेत.

SCROLL FOR NEXT