Latest

भूकंपाच्‍या धक्‍क्‍याने अफगाणिस्तान हादरले

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अफगाणिस्तानला आज ( दि.12) सकाळी ७.३५ वाजता भूकंपाचा धक्का बसला. रिश्‍टर स्‍केवर या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी नोंदली गेली आहे. आतापर्यंत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (Afghanistan Earthquake)

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) X (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी अफगाणिस्तानमध्ये रिश्टर स्केलवर 5.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्‍का जाणवला. यापूर्वी सोमवारी सकाळी अफगाणिस्तानच्या फैजाबादला रिश्टर स्केलवर ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता. फैजाबादच्या दक्षिण-दक्षिणपूर्व (SSE) 151 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे धक्‍के जाणवले. ऑक्टोबरमध्ये अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात झालेल्या प्राणघातक भूकंपात सुमारे 1,482 जणांचा मृत्यू झाला होता. हजारो निवासी घरे उद्ध्वस्त झाली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT