Latest

Earthquake in Bangladesh | बांगलादेशसह ईशान्य भारताला भूकंपाचे धक्के

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : बांगलादेशमध्ये आज (दि. १६ जून) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला. या भूकंपाने भारतातील आसामधील गुवाहाटी शहरासह ईशान्येकडील भाग हादरला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू बांगलादेशात होता. सकाळी १०.१६ वाजता या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

बांग्लादेशमध्ये आज (दि.१६ जून) शुक्रवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिदू ७० किमी खोलीवर होता, अशी माहिती देखील 'नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी'ने (Earthquake in Assam) दिली आहे.

यापूर्वी ११ जून रोजी सकाळी ११.३५ वाजता आसामच्या मध्यवर्ती भागात (Earthquake in Assam) 3.6 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील सोनितपूर जिल्ह्यात पाच किमी खोलीवर होता, अशी माहिती 'नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी'ने दिली होती.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT