Latest

Turkey earthquake updates : तुर्की-सीरियातील भूकंपबळींचा आकडा ३४ हजारांवर

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाइन डेस्क : तुर्कस्तान आणि सीरियाला हादरवलेल्या सोमवारच्या विनाशकारी भूकंपानंतर मृतांची संख्या दिवंसेदिवस वाढतच आहे.  सीएनएनच्या वृत्तानूसार, मृतांचा आकडा ३४ हजारांवर गेला आहे. तर हा आकडा ५०,००० च्या घरात जावू शकतो, अशी भिती संयुक्त राष्ट्रांच्या (UN – United Nations) मदत विभागाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांनी वर्तविली  आहे. तुर्की आणि सीरियामध्ये झालेला भूकंप हा दोन दशकांतील सर्वात भीषण भूकंप आहे. (Turkey earthquake updates)

नुकतेच संयुक्त राष्ट्रांचे (UN – United Nations) मदत प्रमुख मार्टिन ग्रिफिथ ( Martin Griffiths) यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींचा आकडा  ५०,००० च्या वर जावू शकतो. मृतांची संख्या सध्या २८ हजारांहून अधिक आहे. ती दुप्‍पट होईल. अचूक अंदाज लावणे कठीण आहे की मृतांचा आकडा किती असेल; पण हा आकडा दुप्पट किंवा अधिक होईल. आता भूकंपातील जखमींची काळजी घेणे गरजेचे आहे."

तुर्कीमधील आतापर्यंतचा सर्वात विनाशकारी भूकंप

तुर्कीमध्ये आतापर्यंत बऱ्याचवेळा भूकंप झाले आहेत. आतापर्यंचे भूकंप पाहता फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेला हा भूकंप सर्वात मोठा विनाशकारी आहे. यापूर्वी २७ डिसेंबर १९३९ ला तुर्कीमध्ये भूकंप झाला होता. त्याची तीव्रता ८.२ रिश्टर स्केल होती. यात तब्बल ३०,००० हून अधिक लोक मृत झाले होते. (Turkey earthquake updates)

Earthquake death update

हेही वाचा

SCROLL FOR NEXT