Latest

Earthquake : दोन महिन्यात जाणवले २९४ भूकंपाचे धक्के; राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेची माहिती

backup backup

नवी दिल्ली, १७ जून, पुढारी वृत्तसेवा, Earthquake : देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सातत्याने येणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये दहशत आहे. विशेष म्हणजे याच आठवड्यात राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. हिमालय क्षेत्र भूकंपाच्या अनुषंगाने संवेदनशील आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये भारत तसेच शेजारी देशांमध्ये २९४ भूकंपाचे धक्के जाणवल्याची आकडेवारी समोर आली आहे.

एनसीएस अर्थात राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेचे भूकंप देखरेख केंद्र (ईएमसी) देशभरात १५२ ठिकाणी आहे. या केंद्रानुसार एप्रिल आणि मे महिन्यात या भूकंपाची नोंद घेण्यात आली. यातील ९० टक्क्यांहून अधिक भूकंपाचे धक्के उत्तराखंड सह हिमालय तसेच हिंदुकुश क्षेत्रात जाणवले. एनसीएसच्या अहवालानुसार हिमालयीन क्षेत्रातच बहुतांश भूकंप येत आहेत. एप्रिल महिन्यात या भागात १४४ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. Earthquake

यातील १३० भूकंप भारत तसेच देशाच्या सिमेलगत असलेल्या आशिया देशात आले. काही छोटे भूकंप महाराष्ट्र, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश जाणवले. एप्रिलमध्ये तीन रिक्टर स्केलहून कमी तीव्रता असलेले तीस, पाच रिक्टर स्केलहून अधिक तीव्रता असलेले पाच भूकंपाची नोंद घेण्यात आली. यातील २९% भूकंप ३ ते ३.९ रिश्टर स्केल आणि, ३७ टक्के ३.९ ते ४ रिक्टर स्केल चे होते. ५ ते ५.९ रिश्टर स्केलचे पाच भूकंप होते. मे महिन्यात १५० भूकंपाची नोंद घेण्यात आले. यातील बहुतांश भूकंप हिंदूकुश, जम्मू-काश्मीर तसेच उत्तराखंडमध्ये नोंदवण्यात आले. Earthquake

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT