Latest

Dwayne Johnson : ‘द रॉक’ला सु्ध्दा लागली भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील क्रिकेट चाहते टी-२० विश्वचषक स्पर्धेतल्या सर्वात प्रतीक्षेत असलेल्या सामन्याची वाट चाहते पाहत आहेत. हा सामना २३ ऑक्टोबरला रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्पर्धेमुळे दोन्ही संघांमधील सामने मनोरंजनाच्या दृष्टीने नेहमीच ब्लॉकबस्टर ठरतात. (Dwayne Johnson)

आशिया चषक २०२२ मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्या स्पर्धेतील एका सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. विश्वचषक स्पर्धेतील या सामन्याची चाहते आत्तापासूच वाट पाहत आहेत. या सामन्यासाठी अजून एक चाहता उत्सुक आहे. तो म्हणजे WWE सुपरस्टार आणि अमेरिकन अभिनेता 'द रॉक' म्हणजेच ड्वेन जॉनसन. (Dwayne Johnson)

स्टार स्पोर्ट्सने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, प्रसिद्ध अभिनेता ड्वेन जॉन्सन भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याबद्दल उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहे. "जेव्हा महान प्रतिस्पर्धी टक्कर घेतात, तेव्हा जग उभे राहते. हा फक्त क्रिकेटचा सामना नाही. ही वेळ भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याची आहे."असे तो व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT