Latest

नेटिझन्‍सनी ‘ध’चा ‘मा’ वाचलं आणि विराटच नाव कंडोम बनवणार्‍या कंपनीशी जोडलं! मीम्सचा पडला पाऊस

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सोशल मीडियावरील माहितीचा वेग हा कल्‍पनेच्‍याही पलिकडचा आहे. एखादी घटना घडली की, प्रतिक्रिया देण्‍यासाठी नेटिझन्‍स अक्षरक्ष: तुटून पडतात. संपूर्ण माहिती घेण्‍या आधीच आपलं मत मांडण्‍याची स्‍पर्धा सुरु होते. यामध्‍ये जर माहिती एखाद्या सेलिब्रिटी संदर्भातील असेल तर त्‍याची खिल्‍ली उडविण्‍याची आयती संधीच मिळते. मात्र हे सारं करताना इतकी गडबड असते की, अनेकवेळा संपूर्ण माहिती घेण्‍याआधीच नेटकरी आपल्‍या प्रतिक्रिया देतात आणि एकच धमाल उडते. असचं काहीसं विराट कोहलीने एक ब्रँड साठी केलेल्‍या जाहिरातीनंतर घडलं. ( Virat Kohli twist )  जाणून घेवूया ट्विटरवर नेमकं काय घडलं…

Virat Kohli twist : विराट काेहली आला चर्चेत

ट्विटरच्‍या ट्रेंडिंगमध्‍ये सोमवारी #Durex आलं. याचे कारण शोधण्‍यासाठी उत्‍सुक नेटिझन्‍स ट्विटरवर गेले. तर येथे यावरुन मीम्सचा पाऊसच पडला होता आणि हे सारं विराट कोहलीशी ( Virat Kohli) जोडलं गेले होते. त्याचं असं झालं की, मॅट्रेस कंपनी ड्युरोफ्लेक्सने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीबरोबर ब्रँड ॲम्बेसेडर म्‍हणून करार केला आहे. सोशल मीडियावर ही अपडेट समोर आली. यावेळी नेटिझन्सनी 'ड्युरोफ्लेक्स' ऐवजी कंडोम तयार करणार कंपनी 'ड्युरेक्स' असे वाचलं आणि एकच गोंधळ उडला.

ज्या ट्विटर युजर्संनी 'ड्युरेक्स' असे वाचलं त्यांनी मीम्स तयार करण्याची संधी सोडली नाही. आणि या गैरसमजातून अन्‍य ट्विटर युजर्संची करमणूक झाली आणि या चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी विराटच राहिला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT