पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुखच्या वाढदिवसाची उत्सुकता जितकी फॅन्सना लागून आहे, तितकीच त्याचा आगामी चित्रपट डंकीविषयी आहे. SRK आणि राजू हिरानी यांचा एकत्र पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, अशी अपेक्षा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डंकीचा पहिला टीझर शाहरुख खानच्या वाढदिवसादिवशी – 2 नोव्हेंबर 2023 रोजी डिजिटली दाखल होईल. (Dunki Teaser) शाहरुख खान मुंबईत त्याच्या चाहत्यांसाठी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे आणि त्याच्या खास दिवशी त्याच्या सर्व चाहत्यांसोबत टीझर रिलीज होणार आहे. (Dunki Teaser)
संबंधित बातम्या –
पठाणचा ट्रेलर शाहरुखने दुबईतील बुर्ज खलिफावर रिलीज केला होता. त्यामुळे डंकीचा टीझरदेखील बुर्ज खलिफावर रिलीज केला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाहरुखचे या चित्रपटाशी संबंधित अनेक पोस्टर व्हायरल झाले आहेत. रिपोर्टनुसार, डंकीच्या निर्मात्यांनी टीझरची रिलीज डेट फायनल केली आहे, जे खूप खास असणार आहे. डंकीचा टीझर शाहरुखच्या वाढदिवसा दिवशी नम्हणजे २ नोव्हेंबर रोडी रिलीज केला जाईल.
निर्मात्यांनी सर्व तयारी केली आहे. हा टीझर डिजिटल विश्वात रिलीज केला जाईल. डंकीला सेन्सॉर बोर्डाकडून U सर्टिफिकेट मिळालं आहे. सोशल मीडियावर याची खूप चर्चा होत आहे. निर्मात्यांनी डंकी २१ डिसेंबर रोजी रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण २२ डिसेंबरला प्रभासचा सालार येणार आहे.