Daroga Happu Singh : दरोगा हप्‍पू सिंगची ग्‍वाल्‍हेरकरांमध्येही क्रेझ!

Yogesh Tripathi
Yogesh Tripathi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मध्‍ये दरोगा हप्‍पू सिंगची भूमिका साकारण्‍यासाठी लोकप्रिय असलेले योगेश त्रिपाठी ( Daroga Happu Singh) मध्‍यप्रदेशमधील नवरात्री उत्‍सवात सामील झाले आहेत. त्‍यांनी हा सण साजरा करण्‍यासाठी ग्‍वाल्‍हेरला भेट देत स्‍थानिक नवरात्री उत्‍साहाचा आनंद घेतला. सर्वांसो‍बत गरबा नृत्‍य देखील केले. नवरात्री साजरीकरणा दरम्‍यानच्‍या या अनुभवाबाबत त्‍यांनी आपलं मत व्‍यक्‍त केलं आहे. (Daroga Happu Singh)

संबंधित बातम्या 

योगेश त्रिपाठी ( Yogesh Tripathi ) हे उत्‍साहात सहभागी होत म्‍हणाले की, 'ग्‍वाल्‍हेरमधील उत्‍साही वातावरणाने माझे मन जिंकले आहे. गेल्‍या वर्षी नवरात्रीदरम्‍यान मी शहरातील उत्‍साहपूर्ण वातावरण पाहून भारावून गेलो. या वर्षी पुन्‍हा एकदा नवरात्री साजरीकरणामध्‍ये सामील होण्‍याचा अनुभव अद्भुत होता. मी उपस्थित लोकांनी माझ्यावर केलेला आपुलकी व प्रेमाचा वर्षाव पाहून भारावून गेलो. गरबादरम्‍यान लोकांना पारंपारिक पेहराव करत गरबा नृत्‍य करताना पाहून खूप आनंद झाला. आणि त्‍यांची ऊर्जा पाहून मला देखील गरबा नृत्‍य करावेसे वाटले. मी देखील उत्‍साहामध्‍ये सामील झालो. मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन' मधील माझी भूमिका दरोगा हप्‍पू सिंगप्रती लोकांचे भरभरून प्रेम प्रकर्षाने दिसून आले. गरबा खेळताना त्‍यांनी माझ्याशी बुंदेलखंडी भाषेमध्‍ये संवाद साधला. असेही ते म्हणाले.

काही जणांनी विचारले की, 'कितनी न्‍योच्‍छावर लेंगे आप?' (हसतात) मी उत्‍साहाने उत्तर दिले, 'इस बार बस प्‍यार की न्‍योच्‍छावर लेंगे हम'. ग्‍वाल्‍हेरचा संपन्‍न ऐतिहासिक वारसा, तसेच येथील लोकांचा स्‍वागतार्ह स्‍वभाव या गोष्‍टींनी माझी भेट संस्‍मरणीय केली.

भव्‍य ग्वाल्‍हेर किल्‍ला आणि स्थानिक हस्तकला व कापडासाठी प्रसिद्ध गजबजलेल्या पाटणकर बाजारामध्ये फेरफटका मारण्‍याचा अनुभव उत्‍साहवर्धक होता. फूडप्रेमी असल्‍याने मी गोड इमार्तिस, कुरकुरीत कचोरी व पोहा जिलेबीचा मनसोक्‍त आस्‍वाद घेतला. ही ट्रिप माझ्या मनात सदैव स्‍मरणात राहिल आणि मी पुन्‍हा एकदा ग्‍वाल्‍हेरला भेट देत नवरात्री उत्‍साहामध्‍ये सामावून जाण्‍यास उत्‍सुक आहे.' असेही योगेश त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news