Latest

India-Pak Match : भारत-पाकिस्तान मॅचमुळे रुमभाडे १ लाख रुपये! हॉटेल मालकांची चैनी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०२३ च्या विश्वषकाचा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत-पाक सामन्यामुळे अहमदाबादमधील हॉटेल रूमच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. एका अहवालानुसार अहमदाबादमधील हॉटेल रूमचे (Hotel Rate) दर एक लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पूर्वी हे दर ५० हजार रुपयांवर होते. गुरुवारी बदललेल्या दरांमुळे चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. (India-Pak Match)

वर्ल्ड कप 2023 चे एकूण पाच सामने अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत. भारत-पाक सामन्यासोबतच अंतिम सामनाही येथे खेळवला जाणार आहे. त्यामुळे हॉटेलच्या खोल्यांचे दर वाढले आहेत. NDTVने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरला होणार्‍या भारत-पाक सामन्यामुळे येथील हॉटेल रुमचे दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या दरामध्ये १० पटीने वाढ झाली आहे. भारत पाकिस्तान सामन्यामुळे आता काही दिवस इथे येणाऱ्या क्रिकेट प्रेमींसह पर्यटकांना एका रात्रीसाठी एक लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

अहमदाबादमध्ये लक्झरी हॉटेलच्या खोल्या सामान्य दिवशी ५ ते ८ हजारांच्या दरम्यान उपलब्ध असतात. मात्र आता हा दर ४० हजार ते एक लाखापर्यंत पोहोचला आहे. Booking.com नुसार, २ जुलै रोजी एका लक्झरी हॉटेल रूमची किंमत ५,६९९ रुपये होती. मात्र १५ ऑक्टोबर रोजी याच हॉटेलच्या रुमचे दर ७१,९९९ रुपयांवर गेले आहेत. तसेच साध्या हॉटेलचे खोलीचे भाडे सामान्य दिवशी आठ हजार रुपये आहेत. मात्र या सामन्याच्या दिवसासाठी ९०६७९ रुपये मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT