Latest

पुण्यातील शेळगाव परिसरात रात्री फिरू लागला ड्रोन कॅमेरा

अमृता चौगुले

शेळगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेळगाव परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस ड्रोन कॅमेरा फिरू लागल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. ड्रोन कॅमेरा रात्रीचा का आणि कशासाठी फिरतोय?याचे उत्तर पोलिस प्रशासनाकडे नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेळगाव (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि. ३०) शेळगाव परिसरातील गावठाण वैदवाडीसह आजूबाजूच्या परीसरात रात्रीच्या वेळेस कॅमेरा फिरताना नागरिकांना दिसून आला यामुळे भीतीपोटी नागरिकांनी रात्र जागून काढली आहे. यावेळी शेळगाव येथील मनोहर जाधव या शेतकऱ्यांनी सांगितले की रविवारी रात्री नऊ वाजता माझ्या बंगल्यावर पाच मिनिट ड्रोन कॅमेरा घिरट्या घालत होता. पुन्हा तो निमगाव केतकीच्या दिशेने गेला असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळें पोलिसांनी व प्रशासनाने त्वरित ड्रोन कॅमेरा फिरण्यामागचा उद्देश शोधून काढावा, अशी देखील मागणी त्यांनी होत आहे.

सध्याचा डाळिंबाचा बाजारभाव जादा असल्यामुळे एक तर चोरीच्या उद्देशाने डाळिंब बागा शोधण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर होतो की काय? किंवा डाळिंब भागाच्या संरक्षणार्थ शेतकरी देखील रात्रीच्या वेळेस फोन कॅमेरा फिरवतात का?अशी देखील शंका पोलिस प्रशासनामधून व्यक्त होत असुन ड्रोन कॅमेरा फिरण्यामागचे कारण पोलीस शोधत आहे. जर कोणी शेतकरी शेतातील डाळींबाच्या संरक्षणात विनापरवाला ड्रोन कॅमेरा फिरवून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे वालचंदlनगरचे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी सांगितले.

बारामती विमानतळ येथील "कार्व्हर एव्हिएशन"शी संपर्क साधणार

बारामती विमानतळ येथील "कार्व्हर एव्हिएशन" या संस्थेमध्ये ड्रोन पायलट ट्रेनिंग दिले जात आहे. या ड्रोनला Remotely Piloted Aircraft (RPA)असेही म्हटले जाते. हे ड्रोन अगदी ४०-५० किलोमीटर अंतरावरून कंट्रोल केले जाऊ शकते. शेळगावसह इंदापूर तालुक्यात फिरणारी ड्रोन बारामती येथील कार्व्हर एव्हिएशन" या संस्थेची असू शकतात. या संदर्भात त्या संस्थेशी संपर्क करून खात्री करण्यात येईल असे देखील वालचंदनगरचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विक्रम साळुंखे व पोलीस उपनिरीक्षक अतुल खांदारे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT