Latest

Drone Attack In Indian Ocean : इस्रायलच्या व्यापारी जहाजावर हिंदी महासागरात ड्रोन हल्ला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: हमास- इस्रायलमधील युद्ध अद्याप सुरूच आहे. दरम्यान, हिंदी महासागरात इस्रायली जहाजावर ड्रोनने हल्ला करण्‍यात आला. या हल्‍ल्‍यात जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे, असे वृत्त 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Drone Attack In Indian Ocean)

'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ड्रोन हल्ल्यामुळे शनिवारी (दि.२३) हिंदी महासागरातील एका व्यापारी जहाजावर स्फोट झाला. यामुळे आग लागली.   हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे एका सागरी एजन्सीने सांगितले आहे. हल्ला झालेले जहाज हे लायबेरियाचा ध्वज असलेले इस्रायलशी संलग्न असल्याचेही अन्य एका सागरी संस्थेने म्हटले आहे. (Drone Attack In Indian Ocean)

ब्रिटीश सैन्याच्या युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स आणि सागरी सुरक्षा फर्म अ‍ॅम्ब्रे यांच्या म्हणण्यानुसार, हिंद महासागराच्या भारताच्या किनारपट्टीवर ही हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली. दरम्यान लायबेरियन ध्वज असलेल्या जहाजावरील आग लागलेल्या टँकरमध्ये रासायनिक उत्पादने होती. हे व्यापारी जहाज इस्रायल सागरी दलाशी संलग्न असण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारलेली नाही. परंतु ब्रिटिश सागरी सैन्याने हा हल्ला अनक्रूड एरियल सिस्टमने केला होता, असे म्हणत अधिकारी त्याची चौकशी करत आहेत, असे स्पष्ट केले आहे. (Drone Attack In Indian Ocean)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT