Latest

Driving Licence : ड्रायव्हिंग लायसन्स नसले तरीही वाहतूक पोलिस कापू शकणार नाहीत चलन

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) नसले तरी ट्रॅफिक पोलिस आता तुमचे चलन कापू शकणार नाहीत. पण तुम्ही गाडी चालवत असताना तुम्ही योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. वाहतूक नियमांचे पालन न झाल्यास तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांची माहिती.

डिजीलॉकर या भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत लॉन्च केलेल्या ऑनलाईन सेवेमार्फत तुम्ही सर्व कागदपत्रे येथे सुरक्षितरित्या ठेवू शकता. वास्तविकता आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन फिरू शकत नाही. कारण बऱ्याचदा ही कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यता असते.

काहीवेळा घराबाहेर पडताना एखादे महत्त्वाचे दस्ताऐवज घेणे विसरते. अशावेळी तुम्ही या डिजीलॅाकरचा वापर करून आवश्यक असणारी कागदपत्रे हवे तेथे सादर करू शकता. (Driving Licence)

याच डिजीलॅाकर अंतर्गत तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे save करू शकता आणि सुरक्षित ठेवू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रवासामध्ये जर का पोलिसांकडून कधी लायसन्सची मागणी केली गेली तर अशावेळी या डिजीलॅाकरमुळे तुम्ही स्वत: ची सुटका करून घेऊ शकता. त्यामुळे आता लायसन्स सोबत न ठेवता फिरणे हे डिजीलॅाकरमुळे सोपे झाले आहे.

वास्तविक हे डिजीलॉकर तुमच्या आधार कार्ड आणि फोन नंबरशी लिंक केलेले आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी PDF, JPEG किंवा PNG फॉरमॅटमध्ये अपलोड करून सेव्ह करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या कागदपत्रांवर ई-स्वाक्षरी देखील करू शकता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT