Latest

Liquor : ‘तुमच्या आरोग्यासाठी प्या…’ रुग्णवाहिका चालकाकडून रुग्णाला चक्क दारूचा पेग ऑफर! व्हिडिओ व्हायरल…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Liquor : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका रुग्णवाहिका चालकाने आपल्या रुग्णवाहिकेतील रुग्णाला चक्क दारू ऑफर केली. तुमच्या आरोग्यासाठी प्या… असे म्हणत त्याने रुग्णासाठी आणि स्वतःसाठी पेग भरला. नंतर चालकासह रुग्णानेही दारुचा पेग रिचवला. रुग्णवाहिका चालकाच्या या कृतीचा सोशल मीडियात जोरदार निषेध करण्यात येत आहे. अनेकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. एनडीटीव्हीने पीटीआयच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Liquor : ही घटना ओडिसातील जगतसिंगपूर येथील आहे. सोशल मीडियावर जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ही घटना उघडकीस आली. जगतसिंगपूरच्या तिर्तोली या समुद्रकिना-या लगतच्या छोट्या शहरातील ही घटना आहे. व्हिडिओमध्ये रुग्णवाहिका चालक तिर्तोल परिसरात महामार्गाच्या कडेला आपले वाहन पार्क करताना दिसतो. त्यानंतर त्याने स्वतःसाठी आणि रुग्णासाठी एक-एक पेग बनवला. नंतर या चालकाने रुग्णाला आपल्या आरोग्यासाठी प्या, असे म्हणत रुग्णाला दारूचा पेग ऑफर केला. स्ट्रेचवर झोपलेला रुग्ण ज्याच्या एका पायाला प्लॅस्टर आहे त्याने स्ट्रेचरवर झोपून त्याचे तो पेग रिचवला सुद्धा! रुग्णवाहिकेत एक महिला आणि एक लहान मूलही सुद्धा दिसत आहे. दरम्यान या व्हिडिओची पीटीआयला स्वतंत्रपणे पडताळणी करणे शक्य झाले नाही. हा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्यांनी काढून सोशल मीडियावर अपलोड केला.

Liquor : हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने रुग्णानेच दारू मागितली होती, म्हणून मी दिली, असे म्हणत अंग झटकण्याचा प्रयत्न केला.

Liquor : दरम्यान, याबाबत जगतसिंगपूरचे मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी (CDMO) डॉ क्षेत्रबासी दाश यांनी पीटीआयला सांगितले की, "ही खाजगी रुग्णवाहिका असल्याने, आमच्याकडे काही सांगण्यासारखे नाही. पण आरटीओ आणि संबंधित पोलिस स्टेशनने चुकीच्या चालकावर कारवाई केली पाहिजे." या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी या घटनेची चौकशी करून रुग्णवाहिका चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Liquor : तिर्तोल पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक जुगल किशोर दास यांनी सांगितले की, कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही आणि एफआयआर नोंदवल्यानंतरच तपास सुरू केला जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT