Latest

Dr Pradip Kurulkar : डॉ. प्रदीप कुरुलकरचा पॉलिग्राफ चाचणीचा अर्ज फेटाळला; न्यायालयाच्या निर्णयाने ATS ला धक्का

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हनिट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरची(Dr Pradip Kurulkar) पॉलिग्राफ आणि आवाजाची चाचणी करण्याबाबत (व्हाइस लेअर अ‍ॅनलिसिस) दहशतवाद विरोधी पथकने (ATS) केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी याबाबतचे आदेश दिले.

पुण्यातील दिघी येथील डीआरडीओतील संचालक शास्त्रज्ञ डॉ. कुरुलकर(Dr Pradip Kurulkar) तपासात सहकार्य करीत नसल्याचे कारण देत त्याची पॉलिग्राफ आणि आवाजाची चाचणी करणे गरजेचे आहे, असे सरकारी वकील अ‍ॅड. विजय फरगडे यांनी न्यायालयात नमूद केले. होते. कुरुलकरने मोबाइलमधून नष्ट केलेला डाटा परत मिळवायचा आहे. कुरुलकर बर्‍याच गोष्टी लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी व्हॉईस लेअर सायकोलॉजिकल अ‍ॅनालिसिस चाचणी करायची आहे. पॉलिग्राफ चाचणीसाठी आरोपीची परवानगी आवश्यक असते.(Dr Pradip Kurulkar)

मात्र, व्हाइस लेअर चाचणीसाठी आरोपीची परवानगी गरजेची नसते, असे अ‍ॅड. फरगडे यांनी युक्तिवादात न्यायालयात सांगितले होते. न्यायालयाने एटीएसच्या अधिकार्‍यांना व्हाइस लेअर अ‍ॅनालिसिस चाचणी म्हणजे काय, ती कशासाठी केली जाते, यापूर्वी ही चाचणी कोणाची झाली आहे का, अशी विचारणा एटीएस अधिकार्‍यांकडे केली. मात्र, अधिकार्‍यांना माहिती देता आली नाही. याच मुद्द्यावर कुरुलकरचे वकील अ‍ॅड. ऋषीकेश गानू यांनी एटीएसच्या अर्जास विरोध केला होता.

कुरुलकरच्या परवानगीशिवाय व्हाइस लेअर अ‍ॅनालिसिस चाचणी, पॉलिग्राफ चाचणी करणे संशयित आरोपीच्या अधिकारांच्या विरुद्ध आहे. कुरुलकरकडून जप्त केलेला लॅपटॉप, मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषण करून डीआरडीओच्या समितीने याबाबतची कागदपत्रे एटीएसकडे सोपविली होती, असे अ‍ॅड. गानू यांनी सांगितले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने एटीएसने दाखल केलेला अर्ज फेटाळला.(Dr Pradip Kurulkar)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT