Latest

देशांतर्गत विमानसेवेत जुलै २०२३पर्यंत ३३८ तांत्रिक समस्यांची नाेंद, ‘ही’ कंपनी आघाडीवर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशांतर्गत विमान कंपन्यांनी (Domestic Airlines) यावर्षी जुलै 2023पर्यंत ३३८ तांत्रिक समस्‍यांची नाेंद केली आहे. इंडिगो कंपनीला सर्वाधिक २०६ तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला आहे. तर एअर इंडिया (४९), गो एअर (२२), स्पाइसजेट (२१) आणि आकासा एअर (१८) यांचा क्रमांक लागतो, अशी माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली आहे.  विमानात बसवलेले घटक/उपकरणे बिघडल्यामुळे विमानात तांत्रिक बिघाड होऊ शकतो. विमान कंपन्यांनी त्यापूर्वी दुरुस्तीची कारवाई करावी, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Domestic Airlines : इंडिगोने नोंदवलेल्या सर्वाधिक तांत्रिक अडचणी

2023 मध्ये जुलैपर्यंत, इंडिगो कंपनीच्‍या विमानात सर्वाधिक (206) तांत्रिक अडचणी नोंदवण्यात आल्या. यासंदर्भातील माहिती कंपन्‍यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ला देणे बंधनकारक आहे. या घटना उपकरणातील बिघाड, हवामान इत्यादीमुळे उद्भवू शकतात, असेही ते म्‍हणाले. तांत्रिक बिघाडांवर उपाययोजना करण्‍याची जबाबदारी संबंधिक कंपनीची आहे. प्रक्रियेचे पालन न करण्याची शक्यता दर्शविणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाल्यास, DGCA ऑडिटची विशेष मोहीम सुरू करू शकते, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

मागील वर्षी म्‍हणजे २०२२ मध्‍ये देशांतर्गत विमान कंपन्यांद्वारे अशा एकूण ४४६ तांत्रिक समस्यांची प्रकरणे नोंदवली गेली. यामध्‍ये इंडिगो( 215), स्पाईसजेट (143) आणि विस्तारा (97) समस्‍यांचा सामना करावा लागला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT