Latest

Dombivli Rape Case : ९ वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कारानंतर बकरीवर देखील अत्याचार

backup backup

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या आरोपीने एका बकरीवर देखील अनैसर्गिक अत्याचार केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले असून आरोपीला याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपीला यापूर्वी देखील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. कारागृहातून सुटून आलेल्या या आरोपीने पुन्हा तोच गुन्हा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी मूळचा मध्यप्रदेश येथील आहे. सुरज शंकर सिंग उर्फ वीरेंद्र शंकर मिश्रा (३२) असे या आरोपीचे नाव असून तो सध्या भिवंडी परिसरात राहत होता. बाल लैंगिक अत्याचार केल्याने १० वर्षांचा तुरुंगवास भोगणाऱ्या सूरज उर्फ विरेंद्रची 14 नोव्हेंबरला तुरूंगातून सुटका झाली होती. एका गुन्ह्याची शिक्षा भोगून देखील त्याने गुन्हेगारी प्रवृत्ती सोडली नाही. तुरुंगातून बाहेर पडलेल्या विरेंद्रने कल्याण येथील फुटपाथवर झोपलेल्या एका ९ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या गळ्यावर चाकूने वार करत तिचा निर्घूण खून केला.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. पोलिसांनी यासंदर्भात एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. मात्र हे कृत्य करणारा तरुण वेगळा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हेगाराचा तपास घेण्यास सुरुवात केली.

आरोपीचा आणखी गुन्हा उघडकीस; बकरीवर अनैसर्गिक अत्याचार

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध १० पथके तयार केली होती. यातील एक पथक मूळ गाव असणाऱ्या मध्य प्रदेशात पाठविण्यात आले, तर भिवंडी येथील सोनाळे गावात एक पथक पाठवले होते. अखेर सूरज उर्फ विरेंद्रला सोनाळे गावातुन अटक केली. या अटकेनंतर आणखी एक मोठी धक्कादायक घटना समोर आली. या आरोपीने सोनाळे परिसरातील एका गोठ्यातील बकरीवर देखील अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.

या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली. एकूणच विरेंद्रने त्याच्या विकृतपणाचा कळस गाठल्याचे समोर आले आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस ठाणाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याची उकल केली असून अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT