Latest

हिंगोली : पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले चिमुकल्यांच्या चेहऱ्याचे व शरीराचे लचके

अमृता चौगुले

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली शहरामध्ये सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद घातला आहे. सोमवारी (दि. १४) एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने शहराच्या विविध भागातील पाच जणांना जखमी केले. यात काही चिमुकल्यांच्या चेहऱ्याचे व शरीराचे लचके देखिल तोडल्याची घटना घडली आहे.

हिंगोली शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकल्या मुलांसह अन्य पाच जणांना जखमी केले आहे. यापैकी एका जखमी मुलाला नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तसेच काही जखमीवर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काही जण वंजार वाडा, पेन्शन पुरा, मस्तानशाहा नगर भागातील असल्याचे समजते.

जखमींची अद्याप नावे कळू शकली नाहीत. पाच जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती जखमी मुलांच्या नातेवाइकांनी दिली आहे. मोकाट भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. हिंगोली शहरात शेकडोंच्या संख्येने भटकी कुत्री रस्त्यावर फिरताना दिसतात. कुत्र्यांना वेळीच आटोक्यात आणले नाही किंवा त्यांचा बंदोबस्त केला नाही तर रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिक व लहानमुलांवर भविष्यात पुन्हा हल्ला होऊ शकतो.

SCROLL FOR NEXT