Latest

विरोधकांनी पप्‍पू म्‍हटलं तर वाईट वाटंत का? राहुल गांधींनी दिले उत्तर, “ते माझ्‍या आजीलाही…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विरोधक 'पप्‍पू' नावाने संबोधित करतात यावर तुम्‍हाला कसं वाटतं, या प्रश्‍नावर काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी सडेतोड प्रत्‍युत्तर दिले आहे. भारत जोडो यात्रेवेळी एका मुलाखतीमध्‍ये राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.

राहुल गांधी म्‍हणाले की, "मला विरोधी पक्षाातील कोणी पप्‍पू म्‍हणत असेल तर यामध्‍ये चुकीचे असे काहीच नाही. कारण हा विरोधी पक्षाच्‍या प्रचाराचा एक भाग आहे. ते भयभीत आहे. विरोधी पक्षाच्‍या मनात एक मोठी भीती आहे. काँग्रेसच्‍या भारत जोडो यात्रेमुळे विरोधक नाराज आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून बोचरी टीका होत आहे. कोणत्‍या नावाने हाक मारली जाते याने मला काहीच फरक पडत नाही. मी तर त्‍यांना नेहमी आवाहन करतो की तुम्‍ही माझे नाव घेत जावा."

Rahul Gandhi : माझ्या आजीला हेच लोग 'गूंगी गुडिया' म्‍हणत असत

हेच लोक (विरोधक) माझी आजी इंदिरा गांधी यांना गूंगी गुडिया म्‍हणत असेत. मात्र अचानक त्‍यांच्‍यासाठी गूंगी गुडिया ही आयर्न लेडी झाली. मात्र माझी आजी नेहमीच आयर्न लेडी होती, असेही त्‍यांनी विरोधकांना ठणकावले. मला कोण काय
म्‍हणतं याचा मी विचार करत नाही. आज तुम्‍ही मला कोणत्‍याही नावाने हाक मारु शकता, असेही आव्‍हानही त्‍यांनी विरोधकांना दिले.

भारत जोडो यात्रा ही २४ डिसेंबर रोजी दिल्‍ली पोहचली असून, आता ३ जानेवारीला काश्‍मीरला रवाना होणार आहे. जम्‍मू-काशमीरमध्‍ये फारुख अब्‍दुल्‍ला, उमर अब्‍दुल्‍ला आणि महबूबा मुफ्‍ती भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT