Latest

Diwali Special Recipe : पाक न जमल्याने तुमचेही लाडू बिघडतात का? पहा कसे बनवायचे पाकातले मऊ ‘रव्याचे लाडू’

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : रव्याचे लाडू (Diwali Special Recipe) ही दिवाळीची आणखी एक स्वादिष्ट पाककृती आहे. पाक नजमल्याने कित्येक गृहिनींचे रव्याचे लाडू बिघडतात. त्यामुळे ऐनवेळी पाकातले रवा लाडू परिपूर्ण होण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी साधी आणि सोपी पद्धत येथे देत आहोत. चला तर पाहूया कसे बनवायचे मऊ, पाकातले रवा लाडू.

Diwali Special Recipe : रवा लाडू

साहित्य:

• २ कप बारीक रवा/ सूजी
• १ कप साखर
• ३/४ कप पाणी
• १ टीस्पून तूप
• १/४ टीस्पून वेलची पावडर

कृती:

• कढई थोडी गरम करून, त्यात एक चमचा साजूक तूप घाला. (साजूक तुपाने सुंदर फ्लेवर येतो)
• रवा घालून तो मध्यम आचेवर सुमारे ७-८ मिनिटे भाजून घ्या. (जास्त भाजला जाणार नाही याची काळजी घ्या)
• रव्याचा रंग बदलू नये, यासाठी तो एकसारखा सतत हलवत राहा आणि भाजून घ्या.
• गॅस बंद करा आणि रवा थंड होऊ द्या.
• यानंतर रव्याचे टेक्सचर चांगले होण्यासाठी ते मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेऊ शकता. (रव्याची पूर्ण पावडर बनवू नका, पण रव्याचा खडबडीत पोत झाला पाहिजे, तुम्हाला नको असल्यास ही स्टेप वगळू शकता)

असा बनवा पाक

• पॅन गरम करा त्यामध्ये साखर घाला.
• यामध्ये पाणी घालून चांगले मिसळून घ्या. आणि याला उकळी आणा.
• हा पाक एकतारी होईपर्यंत 7-8 मिनिटे शिजवून घ्या. आणि वारंवार त्याची कंन्सिस्टन्सी तपासा.
• पाकाची सुसंगतता (कंन्सिस्टन्सी) तपासण्यासाठी चमच्याने पाक थोडा बाजूला काढून घ्या. थोडा वेळ थंड होऊ द्या. यानंतर यामधील सुसंगतता आणि एकतारी होतोय का ते हाताच्या दोन बोटांनी तपासा (म्हणजेच पाकाला तार पकडली पाहिजे)
• पाक एकतारी झाल्यानंतर गॅस बंद करून, त्यात वेलची पावडर घाला.
• तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाकात केशर किंवा सुका मेवा देखील घालू शकता.
• यानंतर यामध्ये भाजलेला आणि मिक्स केलेला रवा घाला आणि चांगले मिसळा.
• यानंतर रवा लाडूचे मिश्रण सुमारे तास ते दीड तास झाकून ठेवा.
•अर्धा किंवा एका तासानंतर झाकण उघडा आणि लाडू वळून घ्या.
• जर पाक कच्चा असेल, लाडू वळता येत नसतील तर ते आणखी थोडे गरम करा.

टिप

• रवा लाडू बनवताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवा भाजल्याने त्याचा रंग बदलू नये. पण त्याचवेळी
तो छान भाजला पाहिजे आणि छान चव आली पाहिजे, याची काळजी घ्या.
• पाक गरम असताना कधीही त्याची सुसंगतता तपासू नका.
• पाक पातळ झाल्यास लाडू चिकट होतील आणि तुम्ही ते वळू शकणार नाहीत. पाक व्यवस्थित असेल, तर लाडू कठीण होऊ शकतात. त्यामुळे बिघडण्यापूर्वीच रवा लाडूची कृती पाहा.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT