Latest

परदेशी भेटवस्तूंची विक्री : इम्रान खान यांना ‘ना’पाक कृत्याबद्दल ‘ही’ मोठी शिक्षा – Disqualification of Imran khan

मोहसीन मुल्ला

इस्लामाबाद, पुढारी ऑनलाईन : पतंप्रधान पदावर असताना परदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंची वस्तुनिष्ठ माहिती न दिल्या प्रकरणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दोषी ठरवले आहे. यामुळे इम्रान खान यांना पुढील ५ वर्षं कोणतेही राजकीय पद स्वीकारण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. (disqualification of imran khan in gifts case)

निवडणूक आयुक्त सिकंदर राजा यांच्या नेतृत्वाखालील ४ सदस्यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे. या निकालानंतर इम्रान खान त्यांचे नॅशनल असेंब्लीतील पदही गमावणार आहेत.

इम्रान खान यांचे प्रतिनिधी फवाद खान यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात दादा मागितली जाणार असल्याचे सांगितले आहे.

नेमका प्रकार काय आहे?

पाकिस्तानात सरकारी अधिकारी आणि पदाधिकारी यांना मिळालेल्या भेटवस्तू तोषाखानामध्ये जमा करायच्या असतात. काही कमी किंमतीच्या भेटवस्तू स्वत:कडे ठेवायच्या असतात. या वस्तू त्यांच्या मूल्याच्या ५० टक्के इतकी रक्कम भरून परत घेता येतात. इम्रान खान यांच्या काळात ५० टक्केंचा नियम २० टक्के करण्यात आला.

इम्रान खान यांनी या वस्तू नव्या नियमांनुसार विकत घेतल्या आणि नंतर त्यांची चढ्या दरात विक्री केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. तोषाखाना हा स्वतंत्र विभाग आहे. पदाधिकारी, संसदचे प्रतिनिधी, नोकरशाह यांना मिळालेल्या भेटवस्तू येथे जमा केल्या जातात. हा विभाग १९७४पासून कार्यरत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT