Latest

Disha Patani Trolled : गणेशोत्सवात मॉडर्न पद्धतीने नेसली साडी; दिशा पटानी नेटकऱ्यांकडून ट्रोल

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंबानी यांच्या घरी मंगळवारी (दि.२०) गणेश चतुर्थीचे जोरदार सेलीब्रेशन करण्यात आले. या वेळी अनेक बॉलीवुड सेलिब्रिटींनी अंबानींच्या गणेशोत्सवात हजेरी लावली होती. सर्वजण परंपारिक लुकमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. बॉलिवुड सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. बॉलीवुड अभिनेत्री दिशा पटानी आणि मौनी रॉय यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. दरम्यान, दिशा पटानीच्या मॉडर्न लूकवर चाहते संतापले आहेत. एकीकडे बॉलीवुड सेलीब्रिटींच्या लूकचे कौतुक होत असतानाच दिशा मात्र प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे. (Disha Patani Trolled)

दिशा पटानी नेटकऱ्यांकडून ट्रोल

दिशाने बाप्पाच्या दर्शनासाठी येताना सिल्कची साडी आणि डीप ब्लाऊज परिधान केला होता. काही नेटकऱ्यांना दिशाचा हा अंदाज आवडला नाही. त्यामुळे तिला सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात येत आहे. दर्शनासाठी येत आहेस, किमान तो विचार करुन तरी चांगल्या पद्धतीने साडी नेसायला हवी. हा काही फॅशन इव्हेंट नाही, पुजा आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने व्यक्त केली आहे. तुम्ही बीचवर पार्टी करण्यासाठी आलेला नाहीत, त्यामुळे कपडे योग्य पद्धतीने घातले पाहिजेत, अशा कमेंट्सही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

करिअरच्या खास गोष्टी (Disha Patani Trolled)

दिशा पटानीला मोठा ब्रेक नीरज पांडेचा चित्रपट 'एमएस धोनी: द अनडोल्ड स्टोरी'मधून मिळाला. चित्रपटात सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका केली होती. तिची सुशांतच्या गर्लफ्रेंडची भूमिका होती. दिशाने करिअरमध्ये मुख्य चित्रपटामध्ये 'बागी २', 'भारत', 'मलंग' आणि 'राधे'सहित अन्य चित्रपट केले आहेत. आगामी चित्रपटात धर्मा प्रोडक्शन्सचा 'योद्धा' चित्रपट आहे. याशिवाय अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पादुकोणसोबत 'प्रोजेक्ट के' करत आहे. या चित्रपटामध्ये साऊथ स्टार सूर्यासोबत ती दिसणार आहे. (Disha Patani Trolled)

दिशाने मधून सोडले शिक्षण (Disha Patani Trolled)

बीटेकचे शिक्षण घेत असताना ती ऑडिशन देऊ लागली. शिक्षणात ती खूप हुशार होती. सोबत ती मॉडलिंग करू लागली. लहान वयात ती पैसे कमवू लागली. मधून तिने बीटेकचे शिक्षण सोडले आणि पूर्णपणे आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलें. यावेळी तिला 'लोफर' हा चित्रपट मिळाला होता. एका मुलाखतीत दिशा म्हणाली होती की, ती शिक्षणात हुशार होती. पण बीटेकचे विषय सोपे नव्हते. कॉलेज ड्रॉपआऊट करून ती खुश होती. (Disha Patani Trolled)

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT