पुढारी ऑनलाईन डेस्क : डेटा लीकचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. सरकारी दीक्षा ॲपचा डेटा लीक झाल्याचे उघड झाले आहे. या ॲपच्या माध्यमातून तब्बल १० लाख शिक्षक आणि ६ लाख विद्यार्थ्यांची वैयक्तिक डेटा लीक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या डेटामध्ये नाव, क्रमांक, शाळा आणि इतर तपशील समाविशष्ट आहे. दीक्षा या अधिकृत अॅपवरून हा डेटा लीक झाला आहे. (Diksha App Data Breach)
सरकारी दीक्षा ॲपचा डेटा असुरक्षित क्लाऊड सर्व्हरवर सेव्ह होता. तो डेटा कोणीही सहज ॲक्सेस करु शकत होते. नाव, ईमेल आयडी, शाळेची माहिती व इतर तपशील असा वैयक्तीक डेटा या ठिकाणी सेव्ह होता. या बाबतीत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या ॲपला शिक्षण मंत्रायलयाकडून (पुर्वीचे मानव संसाधन विकास मंत्रालय) २०१७ साली लॉन्च करण्यात आली होते. (Diksha App Data Breach)
२०२० साली कोरोना महामारीचा काळ आला तेव्हा या ॲपवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पर्यंतचे अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला होता. त्या काळात शाळा बंद होत्या मात्र या ॲपच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणात कोणताही खंड पडला नव्हता.
WIRED च्या रिपोर्टनुसार, सरकारी अॅप Diksha मध्ये सुरक्षेसंदर्भात त्रुटी आढळल्या आहेत. मात्र, या अहवालात त्रुटी शोधणाऱ्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या लीकमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचे वैयक्तिक तपशील लीक झाले आहेत.
या अॅपवरील डेटा असुरक्षित क्लाउड स्टोरेजवर सेव्ह केले गेले होते, जिथून हॅकर्स, स्कॅमर आणि कोणीही या डेटामध्ये सहज प्रवेश करू शकतात. या फायलींमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाव, फोन नंबर, ईमेल पत्ता आणि इतर वैयक्तीक माहितीचा समावेश आहे.
अधिक वाचा :