Latest

Diego Maradona : ‘हँड ऑफ गॉड’ बॉलचा होणार लिलाव; लागणार कोट्यवधींची बोली!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : डिएगो मॅराडोनाने (Diego Maradona) १९८६ सालच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध प्रसिद्ध 'हँड ऑफ गॉड' गोल ज्या फुटबॉलने केला त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. हा फुटबॉलचा अंतिम चषकातील पंचांनी इतकी वर्षे आपल्या घरी जपून ठेवला होता. या चेंडूचा लिलाव करून पंचाना कोट्यवधी रूपये मिळू शकतात.

बॉलला लिलावात सुमारे २२ कोटी ते २७ कोटी रूपये मिळण्याची अपेक्षा

३६ वर्षीय चेंडूचा मालकाचे नाव अली बिन नासेर आहे. नासेर हे १९८६ साली झालेल्या अंतिम सामन्याचे पंच होते. अंतिम सामन्यानंतर नासेर यांनी तो बॉल आपल्याकडे जपून ठेवला होता. ज्याचा ते लिलाव करणार आहेत. लिलावकर्ता ग्रॅहम बड ऑक्शन्सने गुरुवारी सांगितले की, या ऐतिहासिक बॉलला लिलावात सुमारे २२ कोटी ते २७ कोटी रूपये मिळण्याची अपेक्षा आहे.

फिफा वर्ल्ड कपच्या चार दिवस आधी होणार लिलाव

कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या चार दिवस आधी १६ नोव्हेंबरला या बॉलचा लिलाव ब्रिटनमध्ये होणार आहे. यादरम्यान मॅराडोनाच्या त्या अंतिम सामन्याशी संबंधित इतर वस्तूंचाही यापूर्वी लिलाव करण्यात आला होता. ज्यातून मोठी कमाई झाली होती. मॅराडोनाने त्या सामन्यात घातलेल्या जर्सीचा लिलाव झाला होता. त्यावेळी लिलावात जर्सीला सुमारे ७६ कोटी इतकी किंमत मिळाली होती.

डोक्याऐवजी हाताने केला होता गोल .

मॅराडोनाने त्या सामन्यात हेडरने गोल करण्यासाठी उडी मारली पण त्याने हेडऐवजी हाताने गोल केला. रेफ्री बिन नासेरने हा गोल ग्राह्य मानत त्याला गोल दिला. इंग्लंडच्या खेळाडूंनी त्याला विरोध केला पण रेफ्री त्याच्या निर्णयावर डगमगले नाहीत. यामुळे अर्जेंटिनाने हा सामना २-१ ने जिंकत विश्वचषकावकर आपले नाव कोरले होते. या स्पर्धेनंतर मॅराडोनाला जगातील महान खेळाडूंमध्ये गणले जावू लागले.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT