Latest

Dhule : चिंचवार शिवारात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; धुळे तालुक्यातील चिंचवार शिवारात वन जमिनीमध्ये सुरु असलेला बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने उद्ध्वस्त केला आहे. या प्रकरणात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील चिंचवार शिवारामध्ये बनावट दारू तयार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी या माहितीची खात्री केल्यानंतर उपनिरीक्षक योगेश राऊत यांच्या पथकाला कारवाई करण्यासाठी पाठवले. या पथकाने रफिक महमुद पटेल याच्या मालकीच्या वन जमिनीत असलेल्या घरावर छापा टाकला. यावेळी घरातून किरण सुधाकर देशमुख, रामसिंग बन्सीलाल ठाकरे, हरीश अरुण पटेल व रफिक मेहमूद पटेल हे आढळून आले. हे टोळके या घरांमध्ये बनावट दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी घराजवळून दोन लाख रुपये किंमतीची (एम. एच 19 ए. एक्स 0 620) क्रमांकाची टाटा सुमोसह 74 हजार 880 रुपये किमतीचे टॅंगो पंच देशी दारूचे 26 बॉक्स, 1 लाख 12 हजार तीनशे वीस रुपये किमतीचे रॉयल स्पेशल व्हिस्कीचे 52 बॉक्स, 3480 रुपये किमतीचे टॅंगो पंच, देशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचे 40 बॉक्स, 50 हजार रुपये किमतीचे पॅकिंग व दारू मिक्सिंग करण्यासाठी उपयोगात पडणारे तीन मशीन यासह दारूच्या बाटल्यांचे बुच आणि अन्य साहित्य आढळून आले.

याप्रकरणी चौकशी केली असता दारूचा हा मुद्देमाल संजय मासूम पटेल व त्याच्या सहकार्याने ठेवल्याची बाब पुढे आली. संजय पटेल याला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता हा मुद्देमाल धुळे तालुक्यातील कावठी येथे राहणाऱ्या गुलाब देविदास शिंदे व गुलाब शिंदे यांचा असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात साक्री येथे राहणारा पाटील नावाचा मित्र तसेच शिरपूर येथील दिनेश नावाच्या व्यक्तीने साहित्य पुरवल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या सर्व आठही जणांच्या विरोधात भादवि कलम 328, 420 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT