Latest

धुळे : वडील गेले, आईने दुसरे लग्न केले ; अकरा वर्षांच्या मुलाने मृत्यूला केलं जवळ

गणेश सोनवणे

पिंपळनेर : (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा,

पिंपळनेर तालुक्यातील आमळी येथे एका अकरा वर्षाच्या मुलाने मृत्यूला जवळ करत जीवन संपवल्याची घटना घडली आहे. त्याचे वडिल हयात नसून त्यांचे निधन झालेले आहे, तर आईने दुसरे लग्न केले आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक माहितीनुसार, आमळी येथील कर्म. बापूसाहेब डि.के.अनुदानित आश्रमशाळेतील अनिल कोमश्या पाडवी (11) या पाचवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीला आली. पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अनिल पाडवी हा आश्रमशाळेतील बाथरुममध्ये आढळून आला. त्याला कर्मचाऱ्यांच्या मदतीने खासगी वाहनातून पिंपळनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. बोरकर यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पोपट पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहाटे 4 वाजता पिंपळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  मयत अनिल पाडवी याचे वडील कोमश्या पाडवी यांचे निधन झाले आहे. त्याच्या आईने दुसरे लग्न केल्याने ती निघून गेली आहे. अनिल याला एक लहान बहिण असून तीसुध्दा आमळी येथील कर्म.बापूसाहेब डि.के.अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT