Latest

Dhanbad Fire Accident : झारखंडमधील धनबादमध्ये भीषण आग; १२ जणांचा होरपळून मृत्यू

अमृता चौगुले

धनबाद; पुढारी ऑनलाईन : झारखंडमधील धनबादमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील जोराफाटक रोडवर असलेल्या आशीर्वाद टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. आगीचे कारण गॅस सिलिंडरचा स्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून अजून मोठी जीवित असण्याची शक्यता देखिल वर्तविण्यात येत आहे. शिवाय या अनेक लोक आगीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Dhanbad Fire Accident)

सध्या अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांचे बचावकार्य सुरू आहे. विशेष म्हणजे या टॉवरजवळ एक रुग्णालयही आहे. भीषण आगीमुळे अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक प्रचंड घाबरले आहेत. सध्या येत असणाऱ्या बातम्यानुसार मृतांच्या वेगवेगळा आकडा वर्तविण्यात येत आहे. सध्या १२ लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका छोट्या मुलाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय अनेक लोक गंभीर जखमी असल्याची माहिती पुढे येत आहे. (Dhanbad Fire Accident)

ही आग आशीर्वाद ट्विन टॉवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली आहे. ज्या घरात आग लागली त्या घरात लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशीर्वाद टॉवरमध्ये 10 मजले आहेत. अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. अग्निशमन दलाच्या २० हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि बचाव कर्मचारी बचाव कार्यात गुंतले आहेत. अपार्टमेंटमधील बहुतांश सदनिका रिकाम्या करण्यात आल्या आहेत.


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT