Latest

जेडीएसची मते मिळाल्यामुळे काँग्रेसचा विजय : देवेंद्र फडणवीस

स्वालिया न. शिकलगार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. मुळात कर्नाटकमध्ये 1985 पासून कुठलेच सरकार रिपीट होऊ शकले नाही. मात्र,या निकालाचा महाराष्ट्र आणि देशाच्या निकालावर काहीही परिणाम होणार नाही.'मुंगेरी लाल के हसीन सपने ' कधी पूर्ण नाही होणार नाहीत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटक निकालावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

२०१८ मध्ये आम्हाला जितकी मते मिळाली त्यात अर्धा टक्का मते कमी झाली पण जागा कमी झाल्या. जेडीएसची पाच टक्के मते कमी होऊन ती काँग्रेसला गेली त्यामुळे आमच्या जागा कमी झाल्या असे स्पष्ट करतानाच या निकालाने काही लोकांना देश जिंकले असे वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजेत, अगदी वार्ड निवडणुकीत आम्ही हरलो तरी त्यांना शहा-मोदींचा पराभव दिसतो अशा शब्दात विरोधकांना सुनावले.
राहुल गांधी पप्पू आहे हे त्यांनी मान्य केले. शरद पवारांना कर्नाटकमध्ये शून्य टक्के मते, जागा मिळाल्या नाही, माझे मतदारांनी ऐकले आणि राष्ट्रवादीचे पार्सल वापस पाठविले. दुसरीकडे आज उत्तर प्रदेश मधल्या लोकल बॉडीचे निकाल आले वन साईड भाजप निवडून आली. जो उत्तर प्रदेश जिंकतो तो देश जिंकतो असे म्हणतात यावर भर दिला. 'बेगाने  शादी में अब्दुलला दिवाणा' अशी काही लोकांची स्थिती आहे. या लोकांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या घरी मुलं झाले तर आनंद व्यक्त केला असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना लक्ष्य केले.
SCROLL FOR NEXT