Latest

दिल्लीत लग्नाला नकार दिल्याने स्वीस महिलेचा हात-पाय बांधून खून

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क:  दिल्ली पोलिसांनी नीना बर्गर (वय 36) नावाच्या स्विस महिलेच्या हत्येचा छडा लावला आहे. या महिलेचा मृतदेह पश्चिम दिल्लीतील टिळक नगर परिसरात शुक्रवारी ( दि. 20) आढळून आला होता. एमसीडी शाळेच्या भिंतीलगत या महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून जनकपुरी येथून आरोपी गुरप्रीतला अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे. (Delhi Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपीने स्विस महिलेचे हात-पाय बांधून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपीने त्याच कारमधून महिलेचा मृतदेह टिळक नगरमधील रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. (Delhi Crime News)

चार वर्षांपूर्वी आरोपीची या महिलेशी एका सोशल मीडिया नेटवर्किंग वेबसाइटवर ओळख झाली होती. त्यानंतर तो त्या महिलेला भेटला होता. दरम्यान, या महिलेने आरोपीला लग्न करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आरोपींने भेटण्याच्या बहाण्याने महिलेला स्वित्झर्लंडहून भारतात बोलावले. त्यानंतर 10 मिनिटांत तिला सरप्राईज देतो, असे सांगून तिचे हात-पाय साखळीने बांधले आणि तिचा गळा दाबून खून केला, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT