Latest

दिल्‍लीत कुस्‍तीपटूंसह आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात, आंदोलनस्‍थळावरुन तंबूही हटवले

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीच्या जंतर-मंतरवर धरणे धरणाऱ्या कुस्तीपटूंसह सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्‍यांनी मुक्‍कामासाठी लावलेले तंबूही हटविण्‍यात आले आहेत. जंतरमंतरवर जवळपास 35 दिवसांपासून संपावर असलेल्या कुस्तीपटूंनी आज ( दि. २८) नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त महिला सन्‍मान महापंचायतीची घोषणा केली होती त्यानुसार नवीन संसद भवनकडे जाण्‍याच्‍या तयारीत असणार्‍या कुस्तीपटूंसह आंदोलकांवर पोलिसांनीकारवाई केली.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. दरम्‍यान गाझीपूर सीमेवर शेतकरी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ जमले होते. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्लीला जाण्यापासून पोलिसांनी रोखल्यानंतर राकेश टिकैत म्हणाले की, ही वैचारिक लढाई आहे, आम्ही जंतरमंतरवर जाणार होतो, तेथून संसदेत जाणार होतो; पण पोलिसांनी आम्हाला इथे रोखले आहे.

दिल्लीत कुस्तीपटूंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना समाजवादी पार्टीचे आमदार अतुल प्रधान यांना मेरठमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.प्रधान यांना शास्त्रीनगर येथील घरी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. घराबाहेर आणि आत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हापूर येथे पोलिसांनी भाकियुच्या कार्यकर्त्यांना रोखले

महिला खेळाडूंच्या समर्थनार्थ भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या आवाहनावरून दिल्लीला जाणार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांनी हापूर येथील टोलनाक्यावर अडवले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चिऊरसी टोलनाक्यावर गोंधळ घातला आणि टाळे ठोकले. शेतकरी महामार्गावरच धरणे धरून बसले. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत घातल्यानंतर हा ठप्प मोकळा झाला. सकाळपासूनच टोल नाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT