Latest

सतीश कौशिक मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्‍यात

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्या मित्राच्‍या फार्म हाऊसवरील सात तासांच्या सीसीटीव्ही फुटेज ताब्‍यात घेतले आहे. कौशिक यांनी होळी साजरी केली होती. या नंतरच्‍या काळातील कौशिक यांचे वास्‍तव्‍य असणार्‍या फार्म हाऊसवरील सीसीटीव्‍ही फुटेज ताब्‍यात घेतल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले आहे. (Satish Kaushik Farmhouse)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशिक यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू नैसर्गिक आणि हृदयविकाराच्या झटक्याने झाला. अहवालालात दिलेल्या माहितीनुसार, हा हृदयविकाराचा झटका कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजमुळे आलेला होता. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत अधिक तपास करण्यासाठी कौशिक यांचा व्हिसेरा राखून ठेवण्‍यात आला आहे. होळी साजरी केल्‍यानंतर कौशिक हे आपल्‍या दिल्‍लीतील मित्राच्‍या फॉर्म हाउसवर मुक्‍कामास होते. या काळातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Satish Kaushik Farmhouse)

अभिनेता सतीश कौशिक यांच्या आकस्‍मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्‍यांच्‍या निधनाने बॉलिवूड इंटस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.  (Satish Kaushik death )

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT