Latest

‘बुलडोझर’ कारवाईला सुरक्षा पुरवण्यास दिल्ली पोलिसांचा नकार

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा :
पोलीस सुरक्षा न मिळाल्याने दक्षिण दिल्ली महापालिकेने (एसडीएमसी) 'बुलडोझर' कारवाई ८ मेपर्यंत पुढे ढकलली आहे. पालिकेकडून दक्षिण दिल्लीतील अनेक भागांमध्ये अनाधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. यासंबंधी पालिकेने दिल्ली पोलीस दलाला पत्र लिहून पोलीस सुरक्षा तैनात करण्याची मागणी केली होती  पंरतु, सुरक्षा पुरवण्यात पोलीस दलाने असमर्थता दर्शवली.

गुरूवारी (दि.०५) पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून जामियानगर परिसरात कारवाई करण्यात येणार होती; पंरतु, जोपर्यंत दिल्ली पोलीस सुरक्षा पुरवणार नाही तोपर्यंत 'बुलडोझर' कारवाई न करण्याचा निर्णय पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याने कारवाई खोळंबली आहे.  भाजपशासित एसडीएमसी ने बुधवार (दि.०४) पासूनच अतिक्रमण विरोधी अभियान सुरू केले आहे. शाहिनबागसह पालिकेच्या अधिकारक्षेत्रातील परिसरात अनाधिकृत बांधकाम या कारवाईअंतर्गत पाडली जात आहेत. लागोपाठ १० दिवसांपर्यंत हे अभियान राबवण्याची योजना पालिकेची आहे.

कालिंदी कुंज आणि श्रीनिवास पुरीत ५ आणि ६ मे ला, न्यू फ्रेंड्स कॉलनीत १० मे ला तसेच मेहरचंद मार्केट, साईबाबा मंदिर स्थित लोधी कॉलनी आणि जेएलएन मेट्रो स्टेशन जवळ ११ मे ला अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे एसडीएमसी अंतर्गत येणाऱ्या शाहिन बागमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये नागारिकता कायदा (दुरूस्ती) विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले होते. कोरोना महारोगराईमुळे मार्च २०२० मध्ये हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. अशात पोलिसांनी सुरक्षा देण्यास असमर्थता दर्शवल्याने पालिकेची कारवाई थंडबस्त्यात जाण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ पाहा : भोंग्यांच्या बाबतीत कायदा काय सांगतो ? | विधितज्ज्ञ असीम सरोदे यांच्याशी बातचीत Asim Sarode

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT