Latest

Delhi-NCR Earthquake : ब्रेकिंग! दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे धक्के

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली-एनसीआरमध्ये आज (दि.११) दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे असून, याची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतासह पाकिस्तानाही जाणवले आहेत. धक्के जाणवताच घरातील लोक आणि कार्यालयात काम करणारे कर्मचारी बाहेर पडले, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Delhi-NCR Earthquake )

अफगाणिस्तानातील फैजाबाद येथील भूकंपाचे धक्के भारतातील दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील पीर पांचाळ परिसरात दक्षिणेला देखील जाणवले. तसेच पाकिस्तानातील लाहोर, इस्लामाबाद आणि खैबर पख्तूनख्वा शहरांना देखील भूकंपाचे धक्के बसल्याचे वृत्त पाकिस्तानच्या जिओ न्यूजने दिले आहे. (Delhi-NCR Earthquake )

गुरुवारी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपामुळे पुन्हा एकदा पृथ्वी हादरली. भूकंपाचे हे धक्के बराच वेळ जाणवत होते. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घर आणि कार्यालयातून बाहेर आले. आफगाणिस्तानातील या भूकंपातचे धक्के शेजारील पाकिस्तान आणि भारतातील काही प्रदेशांना देखील बसले आहेत. मात्र सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, असेही माध्यमांनी दिलेल्या वृत्तात  म्हटले आहे. (Delhi-NCR Earthquake)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT