Latest

Mukherjee Nagar fire : दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या आगीची हायकोर्टाकडून दखल; उत्तर द्या, नोटीस जारी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील मुखर्जीनगर येथील कोचिंग सेंटरला (Mukherjee Nagar fire) गुरूवारी (दि.१५ जून) आग लागली. या आगीन कोचिंग सेंटरमधील चार विद्यार्थी जखमी झाले. या घटनेची दिल्ली हायकोर्टाने स्वेच्छा दखल घेतली आहे. दरम्यान, दोन आठवड्यात उत्तर द्या, अशी नोटीस कोर्टाकडून जारी करण्यात आली आहे.

दिल्ली हायकोर्टाने मुखर्जीनगर कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीसंदर्भात दिल्ली अग्निशमन सेवा, दिल्ली पोलीस आणि दिल्ली मनपा यांना नोटीस बजावली आहे. या विभागांना मुखर्जीनगरमधील आगीच्या घटनेसंदर्भात (Mukherjee Nagar fire) दोन आठवड्यांत उत्तर द्या, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच कोर्टाकडून दिल्ली अग्निशमन दलाला अग्निसुरक्षा ऑडिट करण्याचे आणि अग्निसुरक्षा प्रमाणपत्रे जारी केली आहेत की नाहीत? हे तपासण्याचे निर्देश दिले आहेत, असे वृत्त 'एएनआया'ने दिले आहे.

Mukherjee Nagar fire : मुखर्जीनगर कोचिंग सेंटरमधील आगीत चार विद्यार्थी जखमी

दिल्लीतील मुखर्जी नगर भागातील बत्रा सिनेमाजवळ असलेल्या गयाना भवनाला (Mukherjee Nagar fire) ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्‍निशमन दलाची ११ वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. कोचिंग सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. कोचिंग सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी दोरीच्‍या मदतीने खाली उतरत, जीव वाचवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत होते. या दुर्घटनेत कोचिंग सेंटरमधील चार विद्यार्थी जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Mukherjee Nagar fire : विद्युत मीटरमुळे आग, गुन्हा दाखल

मुखर्जीनगर येथील कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीमधील जखमी झालेल्या ६१ जणांना ३ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामधील सुमारे ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. एफएसएल, रोहिणी, दिल्लीच्या फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनेच्यावेळी वेगवेगळ्या कोचिंग सेंटरमधील सुमारे २०० ते २५० विद्यार्थी वर्गात उपस्थित होते. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या विद्युत मीटरमुळे आग लागली असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या आगीच्या दुर्घटनेसंदर्भात IPC कलम 336/337/338/120B/34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असे देखील एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT