Latest

दिल्लीत पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त, केजरीवाल सरकारने व्हॅट कमी केला

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीतील जनतेला मोठा दिलासा देत केजरीवाल सरकारने पेट्रोलचे दर ८ रुपयांनी कमी केले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिल्ली सरकारने हा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारने यापूर्वीच पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला होता. त्यानंतर राज्य सरकारांवर त्यांच्या स्तरावर व्हॅटच्या किमती कमी करून जनतेला दिलासा द्यायचा होता. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी आधीच पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. आता दिल्ली सरकारने पेट्रोलवरील व्हॅट ३० टक्क्यांवरुन १९.४० टक्क्यांवर आणला आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

बैठकीत मोठा निर्णय घेत दिल्ली सरकारने पेट्रोलवरील ३० टक्के व्हॅट सुमारे ११ टक्क्यांनी कमी करून १९.४० टक्के केला आहे. अशाप्रकारे दिल्लीत पेट्रोलचे दर आता ८ रुपये प्रतिलिटरवर आले आहेत. पेट्रोलचे कमी झालेले दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

त्यामुळे आता दिल्लीतील पेट्रोलचे दर एनसीआरमधील शहरांच्या बरोबरीने असतील. दिल्लीत कमी किमतीमुळे पेट्रोल भरण्यासाठी नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचलत का?

SCROLL FOR NEXT