Latest

Delhi : दिल्लीत फसवेगिरीचा रेकॉर्ड, बनावट हॉस्पिटलचा भांडाफोड; डॉक्टर, सर्जन, नर्स, औषधं सगळेच बनावट

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीत एख धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीतील ग्रेटर कैलास मधील एका हॉस्पिटलमधून बनावट डॉक्टरांना अटक करण्यात आली होती, ते हॉस्पिटल एका टोळीप्रमाणे चालवले जात होते.  पीडितांना स्वस्तात उपचार देण्याचे आमिष दाखवून त्यांच्यावर उपचार केले जात होते.  उपचाराच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळले जात होते.  हॉस्पिटलमधून दिल्ली पोलिसांनी बनावट डॉक्टरांना अटक केली होती. आता फक्त डॉक्टरच नाही तर हॉस्पिटलचा संपूर्ण सेटअप बनावट असल्याचे समोर आले आहे. रुग्णांची सुमारे 80 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांनी इंडियन मेडिकल असोसिएशनला पत्र लिहिले आहे. (Delhi )

हॉस्पिटल की टोळी?

पोलिसांनी रुग्णालयाचे मालक डॉ. नीरज अग्रवाल, त्यांची पत्नी पूजा, लॅब टेक्निशियन महेंद्र सिंग आणि डॉक्टर जसप्रीत सिंग नावाच्या सर्जनला अटक केली आहे. त्यांच्यामध्ये दोनच खरे डॉक्टर आहेत ते म्हणजे डॉ. नीरज अग्रवाल आणि डॉ. जसप्रीत सिंग. अग्रवाल यांनी एमबीबीएस केले आहे परंतु दिल्ली मेडिकल कौन्सिलने वेगवेगळ्या वेळी त्यांची नोंदणी तीनदा रद्द केली आहे. शल्यचिकित्सक डॉ. जसप्रीत सिंग हे ऑपरेशन थिएटरमध्ये न पोहोचता, रुग्णाला हात न लावता फोनवरुन शस्त्रक्रिया करत. त्यांच्या नावावर शस्त्रक्रिया झाली अस कागदावर नमूद आहे. वास्तवात  ती बनावट डॉक्टरांनी केली आहे.

रुग्णालयात अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, या बनावट डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस सध्या अशा ७ प्रकरणांचा तपास करत आहेत. पोलिसांनी हॉस्पिटलचे दोन रजिस्टर्सही जप्त केले आहेत ज्यात दाखल असलेल्या ४०० हून अधिक रुग्णांचे तपशील आणि प्रिस्क्रिप्शन स्लिप आहेत. गेल्या ५ वर्षांत किती रुग्ण रुग्णालयात दाखल झाले, याचीही माहिती पोलीस घेत आहेत.

Delhi : टोळीचे सदस्य रुग्णालयाबाहेर फिरत…

एखाद्या टोळीप्रमाणे हे रुग्णालय सुरू होते. उपचाराच्या नावाखाली जीवाशी खेळ सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील काही लोक पीडितांच्या शोधात दिल्लीतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या बाहेर फिरत असत. त्यांनी शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना आणि  रुग्णाच्या कुटुंबीयांना अत्यंत स्वस्त उपचार आणि कोणताही विलंब न लावता ऑपरेशन करु अस आमिष दाखवले जायचे. ते त्यांच्या सापळ्यात अडकल्यानंतर बनावट डॉक्टर रुग्णांना कोणतेही औषध आणि इंजेक्शन लिहून देत असत. काही इंजेक्शन्सही द्यायची. बहुतेक प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना त्रास व्हायचा. अशा परिस्थितींसाठी रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. त्या रुग्णाला  सफदरजंग किंवा एम्ससारख्या जवळच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आले होते.

बनावट डॉक्टरांच्या फेऱ्या आणि औषधांच्या नावावर मोठी रक्कम वसूल

रुग्णाच्या तब्येतीबाबत नातेवाईक विचारपूस करू लागले की, अग्रवाल मेडिकल सेंटरचे हाऊसकीपिंग आणि नर्सिंग स्टाफ वरिष्ठ डॉक्टर आताच फेऱ्या मारायला येणार असल्याचे सांगून त्यांना शांत करायचे. थोड्याच वेळात हॉस्पिटलचे मालक डॉ. नीरज अग्रवाल यांच्या पत्नी डॉ. पूजा आणि लॅब टेक्निशियन महेंद्र'दाखल व्हायचे. ऍप्रन घातलेल्या या बनावट डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी सुरू केल्यानंतर. परिचारकांना औषधांची यादी देण्यात यायची, ती अत्यंत महत्त्वाची असल्याने ती तातडीने आणावीत अस सांगितलं जायचं आणि औषधांच्या नावावर मोठी रक्कम वसूल करण्यात यायची.

Delhi : फोनवरून व्हायचं ऑपरेशन

ज्या रूग्णांवर शस्त्रक्रिया करायची आहे. त्यांना ते परिधान केलेल्या कपड्यांमध्येच ऑपरेशन थिएटरमध्ये घेवून जायचे. शस्त्रक्रियेपूर्वी, ऍनेस्थेसियामध्ये इंजेक्शनचा डोस रुग्णाच्या वजन आणि आरोग्याच्या स्थितीवर आधारित दिला नाहीचा तर तो अनियंत्रितपणे दिला जायचा. त्यानंतर ही शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर डॉ. जसप्रीत सिंग अनेकदा शस्त्रक्रिया करताना बनावट डॉक्टरांना फोनवरून काय, केव्हा आणि कसे करावे सूचना देत असे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT