पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित ईडी आणि सीबीआय प्रकरणांमध्ये बीआरएस) नेते के कविता यांना जामीन देण्यास दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने नकार दिल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तिहार तुरुंगात असलेल्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविता यांना दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ११ एप्रिलला अटक केली होती. सध्या त्या तिहार कारागृहात आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १५ मार्च रोजी हैदराबादमधील राहत्या घरातून त्यांना अटक केली होती.
के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत. दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान के. कविता यांचे नाव घेतले होते. त्यानंतर कविता ईडीच्या रडारवर आल्या. ईडीने आरोप केला आहे की 'साउथ ग्रुप' नावाच्या लिकर लॉबीनं आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत 'आप' नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिली होती, असा त्यांच्यावर आराेप आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १५ मार्च रोजी हैदराबादमधील राहत्या घरातून त्यांना अटक केली होती.
हेही वाचा :