Latest

Defense Ministry : संरक्षण मंत्रालयाकडून ३५१ संरक्षण उपकरणांच्या आयातीवर बंदी

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

संरक्षण मंत्रालयाने (Defense Ministry) बुधवारी मोठा निर्णय घेत ३५१ संरक्षण उपकरणांच्या आयातीवर बंदी घातली. संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासह या क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. (Defense Ministry)

संरक्षण मंत्रालयाच्या (Defense Ministry) अखत्यारीतील, संरक्षण उत्पादने विभागाने, शस्त्रास्त्र आणि उपकरणांच्या उप-प्रणाली,जोडण्या,उप-जोडण्या,घटक यांचे स्वदेशीकरण करण्याविषयीची यादी अधिसूचित केली आहे. या यादीत, २५०० अशी आयात होणारी उत्पादने आहेत, ज्यांचे याआधीच स्वदेशीकरण झाले आहे, तसेच ३५१ विदेशी उत्पादने अशी आहेत, ज्यांची पर्यायी स्वदेशी उत्पादने येत्या तीन वर्षात निर्माण केली जातील, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आत्मनिर्भर उपक्रमामुळे ३ हजार कोटींची दरवर्षी बचत होईल, असा दावा मंत्रालयाने केला आहे.विशेष म्हणजे गेल्या १६ महिन्यांमध्ये मंत्रालयाने काढलेली ही तिसरी यादी आहे.

देशाला लष्करी उपकरणाच्या उत्पादनाचे केंद्र बनवण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे.

या निर्णयांमुळे आत्मनिर्भरतेच्या दिशेने देश नवीन उंची प्राप्त करीत असल्याचा विश्वास मंत्रालयाने व्यक्त केला आहे. मंत्रालयानूसार (Defense Ministry) बंदी घालण्यात आलेल्या ३५१ उपकरणांपैकी १७२ वस्तुंच्या आयातीवर डिसेंबर २०२२ पासून बंदी घालण्यात येईल.तर, ८९ उपकरणांवर डिसेंबर २०२३ तर उर्वरित ९० उपकरणांच्या आयातीवर डिसेंबर २०२४ पर्यंत बंदी घालण्यात येईल. या आधी लष्करी व्यवहार विभागाने स्वदेशीकरण केली जाणारी शस्त्रे,प्लॅटफॉर्म,प्रणाली,दारुगोळा इत्यादींच्या दोन याद्या केल्या आहेत.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT