Latest

विदेशी चलनसाठ्यात ६.६ अब्ज डॉलर्सची घट; भारतीय रिझर्व्ह बँक

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाचा विदेशी चलनसाठा गेल्‍या आठवड्यात 6.6 अब्ज डॉलर्सने कमी होऊन 564.05 अब्ज डॉलर्सवर आला आहे. तत्पूर्वीच्या आठवड्यात हा साठा 2.2 अब्ज डॉलर्सने कमी होऊन 570.74 अब्ज डॉलर्सवर आला होता. विदेशी चलन मालमत्तेमध्ये मागील दोन आठवड्यात घट झाल्याचे रिझर्व्ह बॅंकेकडून सांगण्यात आले आहे.

विदेशी चलन साठ्यात विदेशी चलन मालमत्तेचे प्रमाण सर्वाधिक असते. 19 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात हे प्रमाण 5.77 अब्ज डॉलर्सने कमी होऊन 501.21 अब्ज डॉलर्सवर आले आहे. दुसरीकडे सोन्याच्या साठ्यात 704 दशलक्ष डॉलर्सने घट झाली आहे. हा साठा आता 39.91 अब्ज डॉलर्सवर आला आहे. स्पेशल ड्रॉईंग राईट्सचे अर्थात एसडीआरचे प्रमाण 146 दशलक्ष डॉलर्सने कमी होऊन 17.98 अब्ज डॉलर्सवर आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या राखीव निधीचे प्रमाणदेखील 58 दशलक्ष डॉलर्सने कमी होऊन 4.9 अब्ज डॉलर्सवर आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT