Latest

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एडलवाईस कंपनीच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याबाबत रायगडच्या खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर भांदवी कलम ३०६ अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. (Death Case of Nitin Desai)

चित्रपट क्षेत्रात कला दिग्‍दर्शक या नावाला नवी उंची देणारे नाव म्‍हणजे नितीन चंद्रकांत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या करत जीवन संपविले. यानंतर बॉलीवूडसह संपूर्ण महाराष्‍ट्राला धक्‍का बसला. त्‍यांनी टोकाचे पाऊल का उचलेले, याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. यामागील कारण काय असावे, याबाबत सर्वत्र चर्चा सुरु असतानाच ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Death Case of Nitin Desai)

एडलवाइस कंपनी आणि नितीन देसाई

ठराविक मुदतीमध्ये घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज न फेडल्यामुळे प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन डी स्टुडिओवर  जप्तीच्या कारवाईची नामुष्की ओढावणार हाेती. कलिना मुंबईस्थित असणाऱ्या एडलवाइस अ‍ॅसेट रिकंन्स्ट्रक्शन कंपनीने मालमत्ता जप्त करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली. मात्र या प्रस्तावावर जिल्हा प्रशानाने अद्याप कोणताच निर्णय दिलेला नाही, असे विश्र्वसनीय सूत्रांनी सांगितले.

'सीएफएम'कडून घेतले होते १८० कोटी रुपयांचे कर्ज (Death Case of Nitin Desai)

नितीन देसाई यांनी काही कारणांस्‍तव 'सीएफएम' वित्तीय संस्थेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१६ आणि २०१८ अशा वेगवेगळ्या दोन वर्षांमध्‍ये कर्जाचा करारनामा झाला होता. यासाठी देसाई यांनी विविध सर्व्हेनंबर असलेल्या तीन मालमत्ता (26 एकर, 5-89 एकर आणि 10.75 एकर) तारण ठेवली होत्या. काही कालावधीनंतर 'सीएफएम' या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस अ‍ॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली; परंतु कर्जाची वसुली होत नव्हती. १८० कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले होते. मात्र व्याजासह ३ मे २०२२पर्यंत  कर्जाची रक्कम सुमारे २४९ कोटी रुपयांवर पोचल्याचे सूत्रांनी सांगितले. (Death Case of Nitin Desai)

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT