Latest

देशात 5G ला मिळणार 600 Mbps चा स्पीड

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशात 5G सुरू करण्यात आली आहे. याबाबत तज्ञांनी सांगितली की, रिलायन्स जिओने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांमध्ये काही निवडक ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू केल्या आहेत. तर 5G हँडसेट असलेल्या सर्व ग्राहकांसाठी दिल्ली, मुंबई, वाराणसी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, नागपूर आणि सिलीगुडी या आठ शहरांमध्ये एअरटेलने 5G सेवा सुरू केली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना 5G सेवा सुरू करण्यासाठी सिम बदलण्याची गरज नाही. तर युजर्सला आता 5G मध्ये 600 MBPS स्‍पिड मिळणार आहे.

रिलायन्स जिओने म्हटले आहे की, नेटवर्क कव्हरेज काम सुरू असूनही युजर्सना 5G सेवांचा लाभ घेता येईल. इंटरनेटच्या स्‍पिडसाठी   स्टेशन सर्वत्र उभे करण्यात येणार आहेत, असे जिओकडून सांगण्यात आले आहे.

600 Mbps स्‍पिड

5G चे 600 Mbps पर्यंतचे स्‍पिड अपेक्षित आहे. नेटवर्कवरील कमी कॉल आणि डेटाचा वापर हे याचे कारण आहे. परंतु 5G सेवेचे काम पूर्णपणे झालेनंतर 200-300 Mbps चा स्पीड मिळण्याची शक्‍यता असेल, असे तज्ञांनी सांगितले.

BSNL बीएसएनएलचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव याबाबत म्‍हणाले, 5G सेवा सुरू होईपर्यंत ग्राहकांना नेटची मोफत सेवा मिळण्याची शक्‍यता आहे. याद्वारे ग्राहकांना नवीन सेवांचे फायदे याबाबत माहिती देण्यात येईल. 5G सेवा सुरू झालेनंतर कंपनीकडून नवे दर जारी करण्यात येतील आणि त्‍याचे दरही आकारले जातील, असे श्रीवास्तव म्हणाले.

5G मूळे स्मार्टफोनच्या किंमती कमी होणार

क्रिस्टियानो आमोन हे Qualcomm Incorporated चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. क्रिस्टियानो आमोन म्हणाले, देशात 5G सुरू झाल्यानंतर स्मार्टफोनच्या किंमती कमी होतील. तसेच भारतातील 5G ​​वाढीच्या संधी पाहतो, तेव्हा अतिशय महत्त्वाच्या संधी दिसून येतात. भारतातील प्रत्येक डिव्हाइसला 5G सेवा विविध किंमतींवर मिळेल, असे आमोन म्हणाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT