पुढारी ऑनलाईन डेस्क : Cricketers Wife Harassed : आयपीएलच्या हंगामात केकेआर संघाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या नितीश राणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याची पत्नी साची मारवाह हिच्यासोबत गैरवर्तनाचे प्रकरण समोर आले आहे. खुद्द साचीने याबाबत इन्स्टा स्टोरीवरून घडलेली घटना सांगितली आहे. याप्रकरणाची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी दोन तरुणांना अटकही केली असल्याचे समजते आहे.
साचीने इन्स्टा स्टोरीवर म्हटलं की, मी 4 मे रोजी छतरपूरहून मॉडेल टाऊन येथील माझ्या घरी जात होते. दरम्यान, कीर्ती नगरमध्ये सिग्नलला दोन तरुणांनी माझ्या कारच्या दुचाकी आणून थांबवली. यावेळी त्यांनी माझी कार आणि माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, असा अनुभव शेअर केला. (Cricketers Wife Harassed)
कीर्ती नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साचीने ईमेलद्वारे तिची तक्रार नोंदवली होती, त्यानंतर 6 मे रोजी कारवाई करत दोन संशयीत तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, क्रिकेटरच्या पत्नीने दिल्ली पोलिसांच्या ॲक़्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी सुरुवातीला माझी तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप तिने केला आहे. (Cricketers Wife Harassed)
साची पेशाने इंटिरियर डिझायनर आहे. तिने अंसल विद्यापीठाच्या सुशांत स्कूल ऑफ डिझाइनमधून शिक्षण घेतले आहे. तिच्या करिअरची सुरुवात 2015 मध्ये झाली. दिघकाळ डेट केल्यानंतर तिने नितीशसोबत 2019 मध्ये विवाह केला. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
साची ही बॉलिवूड स्टार गोविंदाची नातेवाईक आहे. 'कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा' या शोमधील अभिनेता आणि गोविंदाचा भाचा अभिषेक कृष्णाने याचा खुलासा केला आहे. अभिषेकने सांगितले होते की, साची त्याची चुलत बहीण आहे. या नात्यातून नितीश राणा हा त्याचा मेव्हणा आहे.